आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, December 11, 2007

ू दाता...

दिले नाहिस काहिच, असे म्हणनार नाही
काही दिले तू, असेही म्हणनार नाहि.

लेखनी होती हातात, शब्द होते मनात
भावनांची ऊबळ होती, दाह होता क्षणात
बळ दिलस मनगटात, लिहीन म्हटल काही
हा कसला न्याय म्हणावा, संपली होती शाई

दिले नाहिस काहिच, असे म्हणनार नाही
काही दिले तू, असेही म्हणनार नाहि.

भरकटलो या जंगलामध्ये, तूच दाखवलीस वाट
घशाला पडली कोरड जेव्हा, बाजूला होता पाट
बूडली नाव नदित माझी, शोधीत होतो धरती
तू मात्र उभा होतास, पाहत एकटक तीरावरती

दिले नाहिस काहिच, असे म्हणनार नाही
काही दिले तू, असेही म्हणनार नाहि.

ईवलासाही माझा स्वार्थ नाही,सारी उठाठेव त्यांच्याच पायी
त्यानाच हे न कळावे, भोग हे कसले माझ्या ठायी
आज मागावे तूझ्यापाशी, पण शब्द राहतात मुकेमूके
आशीर्वादासही मंदिरात या, मस्तकही आता का न झुके?

--अमोल

No comments: