ती एक शब्दात उतरती गझल
जी तेव्हाही अधुरीच राहीलेली
ती एक मिटल्या डोळ्याचं बहरत स्वप्न
तीला मी फ़क्त स्वप्नातच पाहीलेली
कधी तीला पावसाची द्रुष्ट लागली
तर कधी एकांताने दगा दिला
कधी तिनं मोठ्या आशेने वाट दाखवली
तर कधी स्वत:च वाटेचा मार्ग बदलला
माझ्या नजरेने, माझ्या ओठच्या शब्दांनी
जशी अवघडलेली ती माझ्या जवळ येताना
तशीच ती तेव्हाही अवघडली त्या शब्दांनी
त्या नजरेनी मागे एकटं मला सोडुन जाताना
शेवटपर्यंत तिची ती मागे परतणारी
सावली पाहतच बराच काळ मी तिथें थांबलो
पाउलांखाली शब्दांचा भरमसाट पाचोळा
अन त्या पानासारखा मीही कोराच राहिलो
माझ्या आयुष्याच्या पुस्तकात आता ती
फ़क्त कोमेजलेली एक पाकळी होऊन दरवळते
क्षणा-क्षणाच्या आठवणीचं उदास अस्तित्व
मागे सोडुन आज ती त्या पाकळ्यातच हरवते
आज ती त्या पाकळ्यातच हरवते............
-----चौकट राजा ....सचिन काकडे
जी तेव्हाही अधुरीच राहीलेली
ती एक मिटल्या डोळ्याचं बहरत स्वप्न
तीला मी फ़क्त स्वप्नातच पाहीलेली
कधी तीला पावसाची द्रुष्ट लागली
तर कधी एकांताने दगा दिला
कधी तिनं मोठ्या आशेने वाट दाखवली
तर कधी स्वत:च वाटेचा मार्ग बदलला
माझ्या नजरेने, माझ्या ओठच्या शब्दांनी
जशी अवघडलेली ती माझ्या जवळ येताना
तशीच ती तेव्हाही अवघडली त्या शब्दांनी
त्या नजरेनी मागे एकटं मला सोडुन जाताना
शेवटपर्यंत तिची ती मागे परतणारी
सावली पाहतच बराच काळ मी तिथें थांबलो
पाउलांखाली शब्दांचा भरमसाट पाचोळा
अन त्या पानासारखा मीही कोराच राहिलो
माझ्या आयुष्याच्या पुस्तकात आता ती
फ़क्त कोमेजलेली एक पाकळी होऊन दरवळते
क्षणा-क्षणाच्या आठवणीचं उदास अस्तित्व
मागे सोडुन आज ती त्या पाकळ्यातच हरवते
आज ती त्या पाकळ्यातच हरवते............
-----चौकट राजा ....सचिन काकडे
No comments:
Post a Comment