आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, August 23, 2007

एकदा मला भेटायला
माझ्या घरी येशील
आणि केस मोकळे सोडून
माझ्या जवळ बसशील

मी दोन्ही हातांमधे
तुझा चेहरा घेईन
रेखीव गहिऱ्या डोळ्यांमधे
बघून हरवून जाईन

तू विचार माझा राज़ा
असं काय बघतो?
मी म्हणेन बघतो कुठे?
पावसात भिजतो

मग तू अलगद, तुझा रेखीव
पापण्या मिटून घेशील
पाऊस ओसरल्यावरचं
निरभ्र आकाश होशील

मग विचार किती वाजले?
वेळ झाली का?
मी म्हणेन हे ग काय राणी
मग तू आलीसच का?

मला जवळ घेऊन
माझी समजून घाल
म्हण राजा सोडून जाताना
माझेही होतात हाल

मग मी तुला पुन्हा एकदा
डोळ्यात साठवून घेईन
आणि एकदम शहाण्यासारखा
तुला जाऊ देईन

-- तुषार मराठे

3 comments:

Milind Phanse said...

"आताशा मी ग्लास रिकामे मदिरेचे करतो" हे विडंबन केशवसुमारांनी केलेले आहे. दुवा :http://www.manogat.com/node/11252

मूळ कविता संदीप खरे यांची "आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो".
या विडंबनाचे श्रेय तुषार मराठे यांना का दिलेले आहे? त्यांनी जर हे विडंबन आपण केल्याचा दावा केला असेल तर हे चौर्य आहे. आणि त्यंनी जर केशवसुमारांचे हे विडंबन केवळ इथे पोचवले असेल तर ते केशवसुमारांच्या नावावर छापून त्यांचे श्रेय त्यांना द्यायला हवे!

Anand Kale said...

धन्यवाद मिलिंद
चुक दुरुस्त केली आहे.

Milind Phanse said...

चूक दुरुस्तीत पुन्हा छोटी चूक झालेली आहे. हे विडंबन केशवसुमार यांचे आहे, केशवकुमार उर्फ प्र.के.अत्रे यांचे नाही.