आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, August 27, 2007

प्राण तू आहेस माझा...
श्वास तू आहेस माझा...
जो कधी सरणार नाही -
ध्यास तू आहेस माझा... !

दुःख तू आहेस माझे...
तू व्यथा आहेस माझी...
अंतही नाही जिला ती
तू कथा आहेस माझी... !

स्वप्न तू आहेस माझे...
तू अपेक्षा फक्त माझी...
प्रेमही तू मुग्ध माझे
प्रीत तू अव्यक्त माझी... !

भास तू आहेस माझा...
तू खुळी चाहूल माझी...
चकवते आहे मला जी
तीच ती तू हूल माझी... !

तू विसावा शांत माझा...
गाढ तू एकांत माझा...
जो जगूही देत नाही
तोच तू आकांत माझा... !

सूर तू आहेस माझा
तूच ना आवाज माझा ?
गीत तू आहेस माझे
तू सुरीला साज माझा... !

तू दिशा आहेस माझी
तू प्रतीक्षा दीर्घ माझी...
रोज मी जी भोगतो ती
तूच शिक्षा दीर्घ माझी... !

...एवढे सारे तरीही
तू कुणी नाहीस माझी
चार घटकाही खरे तर
पाहुणी नाहीस माझी

योगदान : रेशमा

No comments: