आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, July 19, 2007

ग्रामीण म्हणी

१) ठसन पाट्लाची नोवायनी काच कोराची .

२)पैसा कसा काळू जीवाले येते लाळू.

३)आपलं नाही दात को-याले, लोकाचं जावं भरीत क-याले.

४) फ़ुकट फ़ाकट ,तेई चोखट .

५)कई होईन मनचं, कई मोळीन कणसं.

६)घरात खावाव झरत,बाहीर निघावं लळत.

७)चुलत भावाचा उलत भाऊ, चाल कुत्र्या खीर खाऊ.

८) सासूच्या जिनगीवर जवाई उधार,पैशाले पान साळे तिन हजार.

९)पावने आले घर वलं, दार वलं,जेवण करतो म्हशीन दूध नाही देलं, चोई शिवतो तं शिप्याचं काट्टं मेलं.

१०) फ़ुकटाचं खायं त्याले सस्त महाग काय?

११) कधी नाहि मीळला, नी गटकन गीळला

१२) आयत्यावर कोयता

१३) सर्व आहे घरी, नेत नाही बरी

१४) चोराले म्हणते चोरी कर, सावाले म्हणते हुशार राय

No comments: