आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, June 26, 2007

बसची वाट पाहात होतो मी उभा
आकाशात ढगांची भरली होती सभा

अन् ती दिसली मला जराशी वेडी पिशी
सावरत होती पदरला तिच्या काशीबशी

पदर काही केल्या तिच्याने सावरत नव्हता
वादळवाराही त्याचा हट्ट सोडत नव्हता

नभात ढगांची आणखी गर्दी वाढली
टपोऱ्या थेंबांनीही आता तिची कळ काढली

जरासा सहारा म्हणून ती थांब्याकडे वळली
तिची गोड मुद्रा तेव्हा मी न्याहळली

जराशी गोंधळलेली ती कावरी झाली होती
अन् पावसानेही चांगलीच भिजली होती

excuse me म्हणत तिने पुस्तक माझ्या हातात दिले
त्याच क्षणी माझे काळीज झटकन उडून गेले

आवरून सावरून थोडे हसून ती thanx म्हटली
गालावरच्या थेम्बाने तिच्या खळीत उडी घेतली

अन् पुस्तक हातात घेऊन ती परत निघाली
माझी धुंद नजर आताशी ध्यानावर आली

तिला काही म्हणायच्या आत ती निघून गेली
कळली नाही कशी आणि कुठे गायब झाली

अहो वाचकांनो जरा माझ्यावर कृपा करा
तुमच्या मित्र-मैत्रिणींना माझी ही कविता forward करा

काय सांगता तुमच्या आमच्यात ती गवसावी
अन् तिची माझी भेट परत घडून यावी

म्हणा मला वेडा-खूळा किंवा जे म्हणायचय
पण त्या परीशी मला परत एकदा भेटायचय...

--पंकज तिजोरे

No comments: