तव स्पर्श मजला देशील का?
लसलशीत ओठ ओठांवर माझ्या
क्षण एक तरी टेकवशीळ काय?
केसांची तुझ्या मजा आहे
तरळतात ते तुझ्या गालांवरूनच
कितीदा जळतो त्यांवर अन्
झुरतो दुरून दुरुनच
प्रीत माझी तुझी
यंदा जमेल अस वाटत आहेका कुणास ठाऊक मला
तुझच बोलन पटत आहे
रूक्ष होऊ देत सुमनाला
पाहता तुज उमळतील लिहिता न येणआर्यालाही कवितेचे शब्द उमगतीलरूपाला सहज देखता तुझ्या
पार वेडा जाहलो
लीन होऊन भक्तित तुझ्या
मी धन्य धन्य जाहलो
स्नेहाची बरसात होईल तुझ्यावरी
हसून एकदा पहा तरी
लक्ष थरांची भरुन पोकळी
ठेव अधर माझ्या अधराणवरी
-- पंकज तिजोरे
No comments:
Post a Comment