आज का गं सजनी,
तुझ्याविना अंगणी,
तुळस हि मनोमनी गहिवरली.
तुझ्या हाती नाही दिवा,
सांजवेळी पूजावया,
उगवून चंद्रकोर मावळली.
कातरवेळेचा प्रकाश,
पडला नाही काही खास,
मिलनाचा सदा कोणी विस्कटला.
तुझी माझी नवी प्रीत,
विरहाचे नवे गीत,
गाण्यासाठी पावा देखील सावरला.
तुझ्या किती आठवणी,
एक एक जीवघेणी,
आज तुझी जाड वेणी आठवतो.
तुझी माझी कहाणी,
अर्ध्यातच विराणी,
डोळ्यामध्ये किती पाणी साठवतो.
भेटतील नवे सूर,
भेटतील नवे शब्द,
भेटीतले नवे गीत गातील,
सापडेल नवी लय,
संपेल गं सारे भयं,
विरहाचे दिस जेव्हा जातील.
-- अमोल राणे.
No comments:
Post a Comment