तुम्हाला एक प्रसंग सांगतो...........
एकदा मला तो परमपिता परमेश्वर भेटला तेंव्हा मी त्याला सहजंच विचारलं....
तु सगळ्यात चांगली गोष्ट कुठली बनवलीस?"
"माणसाचे मन"...बाप्पा.
"आणि सगळ्यात वाईट गोष्ट?"...मी.
"माणसाचे मन"....बाप्पा खिन्न होत मला पुढे म्हणाला.....
"ऐक, मी एक कुबेर बनवला होता...त्याच्याकडे जगातली सगळ्यात जास्त संपत्ती होती, पैशाची.
मी तुला बनवला अन आता तुझ्याही वाट्याला संपत्ती येतीये, माणसांची..........
लक्षात ठेव, एक माणूस हा कुबेराच्या संपत्तीच्या दसपट मोलाचा असतो...........
मनं जप, मनं जोड, माणसं मिळव.......
विचार कर.........."
तेंव्हापासून हे वेड लागलंय...........
आज एक एक करुन मोती जुळवतोय, माणसं जोडतोय,
खरेच पुन्हा कधी बाप्पा भेटला तर त्याला सांगण्यासाठी...
स्त्रोत : विरोप (ईमेल)
No comments:
Post a Comment