गार गार आला वारा
पानांचीही सर सर
टापोरया थेंबांसवे
पावसाची आली सर
हातावरी सर पडे
आले हळूच शहारुन
पिंजर्यातील मनाला मग
दिले पावसात झोकून
चिंब चिंब झाले तन
काठोकाठ भरे मन
आडोश्याला कुणीतरी
पहातसे चोरून
नजर ती त्याची भिडे
घाबरूनी मी झाली गार
पाहुनी त्याचे खट्याळ हासू
लाज आली मझ फार
नकळत मी त्यास पुसे
ये पावसात चिंब भिझ
कोरड हसुनी तो म्हणे कसा
केव्हाच भिझुनी झाल माझ
शब्द: आनंद काळे
संकल्पना : स्नेहा जैन
No comments:
Post a Comment