दिवस उगवतो आणि मावळतो
पण मनाला ते काहीच नको असते
ते बसून राहते तळ्याकाठी
एकटक डोळे लावून
त्या झळमळणा-या पाण्यावर...
त्यात खोल उतरलेल्या तारांगणावर
तहानलेल्या बालहरिणाने
पाण्यावर ओठ टेकून एकभान व्हावे तसे...
कधी ते फक्त चांदण्यांचे तळे असते
कधी सतारीच्या झाल्या’ त बिंदुमालेचे रूप घेते,
कधी कारंजे होऊन रंगतुषार नाचवित राहते
कधी आपल्या चांदण्या मेघावलीतून
शब्द होऊन झिरमिरते...
लाडक्या मनाचा हा छंद
मी फार जपते...
-- इंदिरा संत
No comments:
Post a Comment