सद्या काही वाचनिय ब्लॉगवर साहित्य चोरी आणि उचलेगिरी यावर चर्चा, वाद-विवाद चालू आहेत आणि या चर्चेत आनंदक्षण ब्लॉगचे नाव घेण्यात येत आहे. याबाबत काही माझ्याकडून...
तसे पाहता ब्लॉगचे नाव यात येणे सहाजिकच आहे, कारण हा ब्लोग म्हणजे एक ई-जालामधील संग्रह आहे.
जेव्हा हा ब्लॉग बनवण्यात आला तेव्हापासुन माझा एकच उद्देश होता, मला आवडलेल्या आणि ई-जालामध्ये ईतरत्र पसरलेल्या मराठी साहित्याचा ( स्त्रोत: मराठी ब्लॉग, संकेतस्थळे); मला ई-पत्राने मिळालेल्या मराठी कविता, लघु कथा, विनोद आणि ईतर मराठी साहित्याचा एक छोटासा संग्रह करणे (उद्देश १).
दुसरे म्हणजे मराठी वाचकवर्गाला ई-जालावर ईतरत्र पसरलेलं मराठी साहित्य एकाच ठिकाणी वाचावयास मिळेल (उद्देश २); त्यावेळेस मराठीब्लॉग.नेट नव्हते किंवा माझ्या माहितीत नव्हते .
ब्लॉगची वैशिष्टे:
ब्लॉगवर जो कुणिहि येईल, काहि वेळापुरते का होईना त्याचे मनोरंजन होईल हेच पाहण्यात आले आहे.
ब्लॉगवर जितके शक्य होईल तितके मराठी भाषेचाच वापर करण्यात आला आहे.
वाचनात आलेली आणि ईतरांना सुध्धा हवी असलेली मराठी संकेतस्थळे, छायाचित्रे, गाणी यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या सगळ्यासाठीच:
मला जसे काही वाचनीय मराठी साहित्य मिळेल तसं मी ते ब्लॉगवर पोस्ट करत गेलो अर्थातच कॉपी-पेस्ट करूनच, पण हे करताना मी त्या लेखकाचे/कविचे नाव (माहित असेल तर) आणि त्याचा स्त्रोत तिथे देतच आलो आहे (काहींच्या भाषेत उचलेगीरी). तसेच ब्लॉगवर लिहिल्याप्रमाणे मी या साहित्याचा कोणताही व्यवहारीक वापर करत नाहि आणि तसे दुस~यानेही करु नये म्हणुन येथिल पोस्ट copy-protected करण्यात आल्या आहेत. या ब्लोगचे feed हि अर्धे करण्यात आले आहे.
माझ्या एका ई-मैत्रिणिच्या आग्रहाखातीर बनवलेला हा ब्लोग मराठी वाचकवर्गालाही आवडला पण काही कारणास्तव तो सध्या वादाच्या भोव~यात पडला आहे.
ही पोस्ट लिहिण्यामागे माझा हेतु हाच की या ब्लोगचा उद्देश सगळ्यांना कळावा आणि जर अझुनही काही शंका असल्यास मला कळवावे, आपल्या प्रतिसादाप्रमाणे योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
आपल्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत..
च.भू.द्या.घ्या.
-- तुमचा आनंद
7 comments:
डियर आनंद
तुझ्या ब्लॉग ची मी आधी पासूनच फॅन आहे
आणि तुझ सगळ कलेक्शन एक सगळ्या ब्लॉग हून वेगळे आहे
त्यात नविन्य आहे . त्यातल्या कविता चारोळ्या आणि विनोदही खूप सुंदर असतात
आणि हो मुख्य म्हणजे ते हा त्या लेखक चारोळीकर अथवा साइड ओनार च्या नावे पोस्टिंग असते..
अस छान कलेक्शन असलेला ब्लॉग वादात यावा याचे खरच आश्चर्य आहे .....
आणि कोणाचा काही गैरसमज असेल तर तो साफ चुकीचा आहे एक प्रामाणिकपणे केलेला हा संग्रह आहे..
यावर वाद करणे माझ्या दृष्टीने तरी चुकीचे आहे .....
If you are so sincere about just making available good stuff, you can always give the LINK, why are you copying and pasting teh whole material on your site ?
STOP the plagiarism. STOP stealing other's material
Just providing doesnt encourage people to read tht stuff.
After publishing the stuff i always give link of tht page..
And I am not doing plagirism if u chk whole blog u will come to knw tht i have never used my name anywhere to take credit..
I guess dear u dont knw wht is plagiarism is.
नमस्कार आनंद
ब्लॉग चांगला आहे. सगळे लेख आणि मराठी साहित्य एकत्र करुन तू ते पुरवतोस. फार चांगला प्रयत्न आहे. जे टीका करतात त्यांचे साहित्य प्रसिध्द करु नकोस.
धन्यवाद
Bas kaa Anand, kuni sangitale tula ki tu chori karatos mhanun
Chyaayalaa aamachi maarayala hich vel milali kaa ? Aapalyaat je zale to ek gairasamaj hota. Mi tula already SORRY mhanalo aahe. Aata punhaa SORRY mhanato ...
Tuze 1 number kaary chalu thev...
Koni kahi mhanale tar "tyaaMchyaa *** ** ***" mhanun sodun de ...
Good Work. Keep it up ...
धन्यवास वमन..
@ हरि- अरे तसे नाहि रे.. मला राग नाही आहे रे कुणाचा.. आणि तुझा तर नाहिच नाहि... आपल्यात फक्त गैरसमज होता एव्हढेच..
ही पोस्ट फक्त ब्लोगचा उद्देश दर्शवण्यासाठि आहे..
आणि ब्लोगचे नाव चौर्य आणि उचलेगीरी या चर्चेत येऊ नये असे वाटले म्हणून आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
Post a Comment