आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, March 18, 2008

स्पर्श...( गीतकथा.. )

स्पर्श...

ही कथा आहे.. एका गरिब ..कष्ट करत जगणार्‍या युवकाची..

अश्याच एका मुंबई सारख्या मायावी नगरीत राबणारा तरूण त्याची ही प्रेम कहाणी.. आज मांडतोय गीतकवितांच्या जुबानी..
त्या तरूणाला .. एकेदिवशी चौकात एक तरूणी दिसते.. तिची नजर सारखी त्याच्याकडे.. रस्त्यावर येणार्या जाणार्या लोकांना गुलाबाची फुले विकणारी ती तरूणी..

तो ही तिच्या सौंदर्यावर भुलतो... कसा ते या सचिनच्या गीतातून ..

हीच ती परी, हीच ती अप्सरा...[गीत..]

हीच ती परी, हीच ती अप्सरा...
हाक अंतरी, भास आहे खरा.....

भरऊन्हात चांदणी ही कोठुन आली,
गंध यौवनाचे उधळे ही भोवताली....

हे रुप-वादळाचे नवे रंग कुठले...?
पाखरु मनाचे शोधीती आसरा.....

हीच ती परी, हीच ती अप्सरा...
हाक अंतरी, भास आहे खरा.....

फुलल्या कळीचा हा दर्वळे सुवास
हृदय बावरे का? अधीरलेत श्वास...

हे मुके गीत ओठातुनी कैसे निघाले?
हरविले सुर सारे, भुललो मी अक्षरा.......

हीच ती परी, हीच ती अप्सरा...
हाक अंतरी, भास आहे खरा.....

-सचिन काकडे [मार्च १७, २००८]
फक्त तुझ्यासाठीच "हा खेळ सावल्यांचा"

ओळख वाढत जाते.. त्याला कळते ती आंधळी आहे.. तो अजुन तिच्याकडे झुकतो..
पुढच्या गीतातून तिला तो आधार देण्याचा आणि तिला आपले प्रेम कळवण्याचा प्रय्त्न करतो..

अशा चांदण्या या जमतात राती..
मनाच्या जणू या सखे सांजवाती..

तुला पाहण्याला फुलतात सारी..
फुले ती जणू धुंद गंधित माती..

नभी पाखरे ही फिरतात येथे
कळे का तयांची कुणा अगम्य नाती..

सखे स्पर्श त्यांचा तुला आज देतो..
कशाला हव्या उगा नयन-ज्योती..

कशी हृदयाची गुज-बात सांगू..
थरथरून जातो तु असता सभोती..
तुझे हात दे तू माझ्याच हाती..

आनंदा..

आणि तो त्याच्या भावना तिच्यापर्यंत पोहचवण्यात कितपत् य्शस्वी होतो हे त्याला कोडेच् असते..
पण त्याच्या नेहमी तिला आधार देण्याने तिच्या मनात त्याच्याबद्दल आदर निर्माण झालेला असतो..
तिच्या मनात तो म्हणजे एखादा राजकुमार.. जो तिला या काळ्या जगातून बाहेर काढेल...

त्याच्या मनातील ती मात्र.. सचिनच्या या गीतातून...

सये, आज भिजलो तुझ्या अमृताने.....

सये, आज भिजलो तुझ्या अमृताने,
मी स्पर्शात ओल्या न्हाऊन आलो...
सवे, पाहिला मी हर्ष अंबराचा,
मी सोहळा दिशेचा पाहुन आलो.....

डोळ्यात तुझीया निजे सावली,
पैंजणे फुलांची सजे पावली...
प्रवास उद्याचा तुझा मखमली..,
मी वाटा सुगंधी शोधुन आलो.....

अंगणी चांदण्याची बरसात होते,
सर ही रुपेरी दारात येते.....
आता धुकेरी नको त्या मशाली,
मी चांद नभीचा घेउन आलो.......

हे बोल माझे तु ओळखावे,
अन, राज सारे तुज आकळावे
वा-यासवे सुर माळुन घे तु...
मी अंतरा तुझाच गाउन आलो....

-सचिन काकडे [मार्च १७, २००८]
फक्त तुझ्यासाठीच "हा खेळ सावल्यांचा"

तो गरिब बिचारा पण तिच्या या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी तो त्याचे डोळे तिला दान करतो....

ओपरेशन होते तिचे.. तिला दिसायला लागते.. ती तिच्या मनातल्या त्या राजकुमाराचा फार शोध घेते...
पण् त्या प्रतिमेशी याची प्रतिमा जुळत नाही.. त्यामुळे तिला याची ओळख पटत नाही...

तो निघुन जातो ति पुन्हा तिथेच फुले विकत.. एकदा तिच्या नजरेस हा आंधळा पडतो.. ती स्वतः अंध असल्याने आपुलकीने त्याला फुल देते.. आणि तेंव्हा तिच्या हाताचा त्याच्या हाताला स्पर्श होतो.. आणि तिला त्याची ओळख पटते..

आनंदाच्या शब्दातून त्याला झालेला आनंद..

स्पर्श..

तु ओळखावे मला तो हर्श आज झाला..
तुझ्या मनाचा मला तो स्पर्श खास झाला..

अजाण होते विसाव्याचे ठिकाण माझे
विरून गेल्या दिशा तो गोड भास झाला..

इलाज आहे कुठे ? गहिवरण्यास येथे..
निरोप माझा आता त्या आसवांस झाला..

तु घेऊन आलीस स्पर्श चांदण्यांचे..
अन् चांदराती आठवणींचा प्रवास झाला..

निशब्द झालो अता मी प्रियेच्या समोरी..
हवाहवासा असा तो आज त्रास झाला..


आनंदा..

अशी गीतकथा जी कधी आपल्या आयुष्यात नकळत घडून जाते..
चार्लीच्या "सिटीलाईट्स" या चित्रपटाच्या कथेला आधारमानून.. लिहीलेली ही कथा आम्हा दोघांना खुप् आवडली तुम्हालाही ती आवडेल अशी आशा..
एका कथेच्या आधाराने एका प्रेमिच्या भावना लिहीण्याचे चैलेंज आम्ही घेतले...
तुम्हाला ही गीतकथा कशी वाटली नक्की सांगा...

आपल्या प्रतिसादाची वाट पाहात आहोत..
आपलेच..

आंद्या आणि सच्या..

( सचिन काकडे , आनंद माने )

स्त्रोत: ओर्कुट
मुळ कल्पना : सचिन काकडे आणि आनंद माने

1 comment:

Your life your Rule said...

friends-(in marathi)-ushira ka asene me tumche kavita vachle ani mala te kup avadle...