आनंदक्षण
.............................
.............................
या जीवनाच्या झाडावरूनी...
उगाच झडले काही क्षण..
आता थोडं जगावं म्हणतो...
काही क्षणांना वेचावं म्हणतो..
या स्वार्थी जगामध्ये..आता..
या क्षणांशिवाय मोठं काय..?
पाचोळ्यागत त्यांना ..आता..
वाया जाउ द्यायचं नाय...
म्हणून माझ्या ओंजळीत...मी..
घेतो भरून चार क्षण..
तुमच्या सोबत आनंदाचे माझे दोन..
माझ्यासोबत आनंदाचे तुमचे दोन..
पैसा कुठे पुरतो कुणाला..
पुरायला ही नाही उरत कुणाकुणाला..
उरतील इथे शेवटी सुद्धा..
वेचलेले ते चार क्षण...
वेचावे म्हणतो माझे काही ' आनंदक्षण '
आनंद माने...
('आनंद' या शब्दाविन जगणे अशक्य ...तुम्हालाही...)
No comments:
Post a Comment