आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, December 26, 2007

तुझ्या सोबतीचं "गुपित" आज मला कळतयं....

हे संध्याकाळचं ऊन
ही सावल्यांची खुण
अन, कातरात घुमती
तुझ्या आठवांची धुन

सखे, आज मला हे सारं काही छळतयं....
तुझ्या सोबतीचं "गुपित" आज मला कळतयं....

माझ्या काळजातला श्वास
या चांद्ण्यांचा भास
अन, अधांरात जागती
तुझ्या स्वप्नाची आस

सखे, आज हे सारं काही सरतयं....
तुझ्या सोबतीचं "गुपित" आज मला कळतयं....

निळ्या सरोवराचा काठ
हिरवं रान घनदाट
अन, तुझ्या हदयी पोहोचती
वेड्या शब्दांची पायवाट

सखे, आज हे सारं काही हरवतयं....
तुझ्या सोबतीचं "गुपित" आज मला कळतयं....

किरणांचा उधाणता हर्ष
सांजेचा सावळा उत्कर्ष
अन, को-या मनात उतरता
तुझ्या आठवणीचा स्पर्श

सखे, आज हे सारं काही ढळतयं....
तुझ्या सोबतीचं "गुपित" आज मला कळतयं....

भिजल्या डोळ्यातला भाव
ओल्या आसवांचा गाव
अन, कवितेपुरतंच राहीलेलं
कागदावरचं तुझं नाव

रोज माझ्या सोबतीला एवढंच फ़क्त उरतयं..
तुझ्या सोबतीचं "गुपित" आज मला कळतयं....

-- सचिन काकडे

No comments: