आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, December 24, 2007

सये उधाण वार्‍यात तू,
तेव्हा तुझ्या गंधात मी,
रेशमाच्या मखमालीत तू
तेव्हा तुझ्या अतूट बंधनात मी...

नभाच्या निळाईत सजतेस तू
तेव्हा गोंजारलेल्या कापसी पिंजात मी,
ओल्या ओल्या सरींच्या श्रावणात तू
तेव्हा घन काळ्या सावळ्या नभात मी...

हिमालयाच्या उंच शिखरात तू
तेव्हा तुझ्या पायथ्याला पुजलेल्या हिमनगात मी,
गंगेच्या उथळ पाण्यात पवित्र तू
तेव्हा तुझ्यात तरंगणार्‍या निर्माल्यात मी..

संतवाणीच्या अभंगात सदा उच्चारलेली तू,
तेव्हा टाळ्मृदुंगाच्या नादात मी,
ईश्वराच्या देऊळी विराजमान तू
तेव्हा तुझ्या आशिर्वादाच्या फुलात मी...

गुलाबाच्या पाकळी ओठात तू
तेव्हा गुलाबी मधाच्या किनारीवर मी,
योवनाच्या लाजरसात भिजलेली तू
तेव्हा मदनाच्या गहर्‍या देहस्पर्शात मी...

श्वासांच्या तडजोडीत व्यस्त तू
तेव्हा अखंड स्पंदनात मी,
जिवनात माझ्या बहरलेली तू
तेव्हा सोबत तुझ्या सये..
हरी बावरा मी , हरी बावरा मी...

--- आ.. आदित्य...

No comments: