सुर यास बावरत्या श्वासांचे
भाव यात सावरत्या नजरेचे
तुला शब्दात उतविणारे हे
गीत तुझे नि शब्द माझे..
साज यात थरथरत्या तणांचे
आठवांत उमलत्या नव्या क्षणांचे
गंध होऊनी दरवळणारे हे
गीत तुझे नि शब्द माझे..
कातरातल्या को-या क्षितीजावरी
चितारते हे अमुर्त शैली
सप्तस्वरांनी दिशा रंगविणारे
गीत तुझे नि शब्द माझे..
स्वर याचा ओठावरी झुलतो
नाद याचा हृदयी रुणझुणतो
नसानसांतुन भिनणारे हे
गीत तुझे नि शब्द माझे..
सप्तसुरांची ही माळ अचानक सुटली
पहीलीच ओळ आज कंठी रुतली
या कोरड्या ओठी अडखळणारे हे
गीत तुझे नि शब्द माझे..
सुर हरवले तुझ्याविन आता
गुंजतात नुसते शब्द दिवाने
सुन्या मैफ़ीलीत घुमणारे हे
गीत तुझे नि शब्द माझे..
-- सचिन काकडे
भाव यात सावरत्या नजरेचे
तुला शब्दात उतविणारे हे
गीत तुझे नि शब्द माझे..
साज यात थरथरत्या तणांचे
आठवांत उमलत्या नव्या क्षणांचे
गंध होऊनी दरवळणारे हे
गीत तुझे नि शब्द माझे..
कातरातल्या को-या क्षितीजावरी
चितारते हे अमुर्त शैली
सप्तस्वरांनी दिशा रंगविणारे
गीत तुझे नि शब्द माझे..
स्वर याचा ओठावरी झुलतो
नाद याचा हृदयी रुणझुणतो
नसानसांतुन भिनणारे हे
गीत तुझे नि शब्द माझे..
सप्तसुरांची ही माळ अचानक सुटली
पहीलीच ओळ आज कंठी रुतली
या कोरड्या ओठी अडखळणारे हे
गीत तुझे नि शब्द माझे..
सुर हरवले तुझ्याविन आता
गुंजतात नुसते शब्द दिवाने
सुन्या मैफ़ीलीत घुमणारे हे
गीत तुझे नि शब्द माझे..
-- सचिन काकडे
1 comment:
sunder, bhawpoorn kawita.
Post a Comment