आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, October 19, 2007

जगण्याचा अर्थ खरा शोधण्यास निघाला..
स्वप्नांचा सुखद किनारा राजा ओढण्यास निघाला..

साला आयुष्य म्हणजे नक्की काय असतं..
स्वतःलाच उत्तर मागत राजा चंदेरी दुनियेत आला...

दुनिया पाहीली स्वप्नांची चंचल मोहक चांदण्यांची..
क्षणीक ते सुख पाहुन वेडा राजा तिथच रमला..

राजा आपला साधा-भोळा पण त्याच्यापरी सारं गाव नव्हते..
तो खेळ होता " सावल्यांचा" त्याला काहीच ठाव नव्हते..

नजरेस पडली राजकुमारी रुप-सौन्दर्य, नितळता ती पाहत बसला..
सोडला तिनं प्रेमळ शब्दांचा अलगद भोवरा राजा भोळा तिथच फसला..

साधं मन समजवत होतं स्वप्नाळु राजाशी तेव्हा सारा गाव भांडला..
पाहता मोहीनी स्वतःची नजरेत त्याचा तिनं लगेच डाव मांडला..

राजाही नशिबाच्या डावात खेळला पहील्याच काही क्षणात हरला..
आपल्याच गावात वेडा ठरला पसारा स्वप्नांचा फक्त मनात उरला..

मैत्री, प्रेम, भावना, आसवं, सा-याचा खोटा बाजार वाटला..
स्वप्न, अपेक्षा, ईछा, आकांक्षा याचा मोठा जुगार दिसला..

खरचं...... मृगजळच सारी दुनिया ही उगा मी या मोहात रमलो..
कालचा "चौकट राजा मी" आज मी क्षणात हरलो......मी क्षणात हरलो.......

-----चौकट राजा [सचिन काकडे ऑक्टोबर १७, २००७]

No comments: