आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, October 29, 2007

कधी अचानक असे काय होते...
माझे मलाच कळत नाही.
मृगजळामागे धावत राहतो,
जे कधिही कुणाला मिळत नाही!

ऑटोत बसल्यावर टॅक्सी दिसते...
आणि विमानाचे स्वप्न पाहतो
उन्हात अनवाणी चालणाऱ्याकडे,
नजर कधी का बरं वळत नाही?

सारे मिळाले तरीही मन अशांत...
अजून भूक शमली नाही इतक्यात
क्षितिजाला स्पर्श करण्याचे स्वप्न,
किती फोल आहे हे उमजत नाही!

इतरांच्या यशाची इर्ष्या करतो...
तिथे पोहोचण्याची फक्त इच्छा करतो
पण सर्वांअंती हे कळू लागते मला की,
माझी हस्तरेषा त्यांच्याशी जुळत नाही!

मृगजळामागे धावत राहतो,
जे कधिही कुणाला मिळत नाही!

कवी : अद्न्यात

No comments: