आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, October 15, 2007

बोलावसच वाटत नाही, तु जवळ असताना...
वाटत तुच सगळा ओळखावस, मी नुसत हसताना...

आमची पहीली भेट, ती किती लाजली होती
ते लाजणं डोळ्यात भरून, माझी रात्र गाजली होती

ऐन पहाटे तुझ्या प्रेमासाठी, मला तरसायचं आहे
त्यासाठि प्राजक्त होवुन, तुझ्या घरात मला बरसायचं आहे

असेल काही - पण पलिकडचा, मी जर तुजला दिसलो नाही
म्हणेन परिचय झाला अपुला, परंतु ओळख झाली नाही.

काय सखे तु जादू केलीस , मी माझ्यातच हरवून गेलो
तुझ्या आसीम प्रेमाखातर, माझं मलाच विसरून गेलो

इतक्य दिवसांनी आज तु नजरेस पडल्यावर
तुझ्या नजरेत मला बंदगी दिसली
एकटेपणाच्या तुफ़ान पावसात रडल्यावर
सखे तुझ्या मिठीत आज माझी जिंदगी हसली

नाव तिचे घेण्यात, वेगळीच नशा आहे
कधीतरी हो म्हणेल, अशी वेडी आशा आहे

हसताना तिच्या गालावर, किती सुरेख खळ्या पडतात
अरसिक मी कितीहि तरी, क्षणात मला खुळ्या करतात

तुझ्यासवे पावसात भिजण्यात, एक वेगळाच आनंद आहे
दोघे चिंब, पाऊस बेफान, वातावरणही पार धुंद आहे

केंव्हा तरी फुलांचे रंग सारे पंखात खोवून ,
त्या मोहाच्या रानामध्ये मीच उडेन पक्षी होऊन

हृदयाच्या नदीला पूर आलाय, तुझ्या तिथे पाणि आटलं कसं,
तरीही मी कोरडेपण जाणवतोय, तुला सागराहून विशाल वाटलं कसं

हसायच्या आधी मला जरा सराव करावा लागतो,
मनावरचा घाव बराच दाबून धरावा लागतो

बंध ना अपुला सुटावा, वादळे येता व्यथेची
मी तुला आधार द्यावा, अन मला तू सावरावे

No comments: