पिकलेलं पान बघुन, हिरव पान रडलं
लोकांना वाटलं, त्यावर दव साठलं
पिकलेलं पान म्हणालं, मी पण होतो
कधी काळी हिरवा, उन पिउन झालो पिवळा
पावसात भिजलो, वाऱ्याबरोबर नाचलो
आयुष्य जगुन, आता थोडा थकलो
वाळुन आता गळणार, आईच्य कुशीत विसावणार
हिरवी पालवी बनुन, पुनर्जन्म घेणार
-- हेमंत मुळे
लोकांना वाटलं, त्यावर दव साठलं
पिकलेलं पान म्हणालं, मी पण होतो
कधी काळी हिरवा, उन पिउन झालो पिवळा
पावसात भिजलो, वाऱ्याबरोबर नाचलो
आयुष्य जगुन, आता थोडा थकलो
वाळुन आता गळणार, आईच्य कुशीत विसावणार
हिरवी पालवी बनुन, पुनर्जन्म घेणार
-- हेमंत मुळे
No comments:
Post a Comment