झिंगतो मी कळेना कशाला
जीवनाचा रिकामाच प्याला!
दूर झाले फुले वेचणारे
वेचतो मी फुलांतील ज्वाला
ही न वाणी तुझ्या वेदनेची
हा सुखाचा तुझ्या बोलबाला!
'काय झाले पुढे आसवांचे?'
हे विचारु नये सांत्वनाला
राहिलो दूर तू.. मी..तरीही
एक स्पर्शाविना स्पर्श झाला
गाव सारेच हे तोतयांचे
नाव माझे विचारु कुणाला?
काढली राञ जागून सारी
चंद्र माझा सकाळीच आला!
कवी : अद्न्यात
जीवनाचा रिकामाच प्याला!
दूर झाले फुले वेचणारे
वेचतो मी फुलांतील ज्वाला
ही न वाणी तुझ्या वेदनेची
हा सुखाचा तुझ्या बोलबाला!
'काय झाले पुढे आसवांचे?'
हे विचारु नये सांत्वनाला
राहिलो दूर तू.. मी..तरीही
एक स्पर्शाविना स्पर्श झाला
गाव सारेच हे तोतयांचे
नाव माझे विचारु कुणाला?
काढली राञ जागून सारी
चंद्र माझा सकाळीच आला!
कवी : अद्न्यात
No comments:
Post a Comment