काही व्याख्या
कॉन्फरन्स रूम : जिथे सगळे बोलतात, कुणीच ऐकत नाही आणि नंतर सगळ्यांचेच मतभेद होतात.
उत्कंठा : आपल्याला कधीही वाटले नव्हते असे काहीतरी आता वाटणार आहे असे वाटणे.
स्मित : जी अनेक गोष्टी सरळ करू शकते अशी सुरेख वक्ररेषा.
ऑफिस : घरकामाच्या धबडग्यानंतर हक्काची विश्ाांती घेण्याचे ठिकाण.
जांभई : विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची दुमीर्ळ संधी.
वगैरे वगैरे : तुमच्या प्रत्यक्ष ज्ञानापेक्षा तुम्हाला फारच जास्त कळते, अशी इतरांची समजूत करून देण्याचे साधन.
अणुबाँब : इतर सर्व शोधांचा अंत घडवणारा शोध.
आशावादी : जो आयफेल टॉवरवरून कोसळताना मध्यावर आला की आनंदून ओरडतो, ''पाहा पाहा, अजूनतरी दुखापत झालेली नाही!!!!''
प्रौढ माणूस : ज्याची दोन्ही टोकांची वाढ थांबली असून आता फक्त मध्यभागाची वाढ सुरू आहे, असा इसम.
मौलिक पुराणवस्तू : जी तुमच्या आजोबानं विकत घेतली, वडिलांनी भंगारात काढली आणि तुम्ही शेकडो रुपये मोजून पुन्हा विकत घेत आहात.
ओव्हरस्मार्ट : तुमच्यापेक्षा स्मार्ट माणूस
कोंबडी : एक असा पक्षी जो तुम्ही त्याच्या जन्माआधीही खाऊ शकता किंवा मृत्यूनंतरही.
शिष्ट : तोंड बंद ठेवून जांभई देण्याची कला अवगत असलेला मनुष्य.
फाइव्हस्टार हॉटेल : जिथे गारढोण, बेचव चहा मिळतो. तो गारच प्यायचा उच्चभ्रू चहा असतो. आणि त्यासाठी तुम्हाला तीनचार महिने सकाळदुपारसंध्याकाळ कटिंग पिऊ शकला असतात, इतके पैसे द्यावे लागतात.
चुंबन : एक प्रभावी साधन जे दोन माणसांना इतके जवळ आणते की त्यांना काही काळासाठी एकमेकांचे दोषच दिसेनासे होतात!!!
डास : एक असा कीटक ज्याच्यामुळे तुम्हाला माश्या निरुपदवी वाटू लागतात.
गुपित : अशी गोष्ट जी तुम्ही एका वेळी एकाच माणसाला सांगता
अहंकार
प्रत्येक अस्वस्थ माणसानं थोडं आत डोकावून पहावं. तिथं त्याला एक अतृप्त जीव सापडेल . माणूस लहान असो ,मोठा असो, त्याला जे काही हवं ते मिळत नसल्याची नांगी सारखा डंख मारत असते.
जी काही आपली पात्रता आहे तीनुसार आपल्याला जे हवं आहे ते मिळत नाही हि भावना सारखी छळत रहाते. शांतपणे जगू देत नाही.
प्रत्येक छोट्यामोठ्या ऒदासिन्यामागे एक सुप्त अहंकार असतो.अहंकारानं भरलेलं मन
काठोकाठ भरलेलं असेल तर त्यात दुसय्रा भावनेचा शिरकाव होणार कसा?

ताकद
जीवनाचा क्रुस हलका असो वा जड असो,ज्याचा त्याला वहावा लागतो.क्रुसाच्या निवडीचं स्वातंत्र्य आपल्याला नाही. तो आपल्या वाट्याला येवू नये किंवा तो आपल्या मनाप्रमाणे असावा अशी प्रार्थना
न करता देवाला सांगावं,क्रुस कसाही दे फ़क्त तो पेलणारा खांदा मात्र मजबूत कर.

धडा
सर्वात जवळची माणसं जास्त तह्रेवाईकपणे वागतात.त्यात आपण मनाला मूळीसुध्दा कुलूप घेउ नये.
परक्या माणसाकडून कशाचीही अपेक्षा करु नये ह्याचा धडा आपल्याला घर बसल्या मिळावा हा त्यांचा सदहेतू असतो.एकदा हा धडा गिरवला म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख निर्माणच होत नाही.

समस्या
एका माणसाच्या समस्येवर दुसय्रा माणसाजवळ उत्तरच नसतं.कारण सल्ला देणारा त्या समस्येपर्यंत पोह्चू शकत नाही.तो स्वतःच्या वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहतो.समस्येतून जाणाय्रा मणसाच्या भुमिकेत तो जाऊ शकत नाही.समस्या सांगणारा माणूस अनुकूल उत्त्तरासाठीच अनेकांना भेटत राहतो आणि त्याला आवडणारा विचार मिळाला की त्या माणसाला ग्रेट मानून खुश होतो.
-व।पु.काळे (महोत्सव)

घर
घर असावे घरासारखे ,नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती
त्या शब्दात अर्थ असावा ,नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे,नकोत नुसती गाणी
सवीकार
जो माणुस स्वत: असमाधानी असतो तो दुसऱ्याला कधीच आनंद देउ शकत नाही.
आपल्या भोवतालच्या व्यक्ति जश्या असतात, तसच आपल्याला त्यांचा स्विकार करावा लागतो.
त्या कश्या असाव्यात, याविषयी आपल्या भावना काय आहेत, याला काही महत्व नसत.
- सुधा मुर्ती - पुन्यभुमी भारत

सुहास्य
सुहास्य वदनाने बाहेर पड्णारा माणूस खरोखरीच रामायणातल्या खारी प्रमाणॆ समाजसेवा करीत असतो, किंवा गंधित फुला प्रमाणे थोड्या प्रमाणत कां होईना जग सुगंधित प्रफुल्लित करीत असतो।

मैत्री
मैत्री म्हणजे विश्वास,तिथं भांड्ण होऊ शकते पण गैरसमज संभवतच नाही.

गैरसमज
गैरसमज हा कैंसर सारखा असतो,तिसरया स्टेजला गेल्यावरच खरं रुप प्रगट करतो.
-- व. पू .काळे. 'ऐक सखे'.

पु.लं. एकदा म्हणाले होते..
"माणसाच्या शरीराचा कोणता तरी एक कोपरा नेहमीच दुखत असतो. फक्त त्या वेदना तीव्र नसल्याने माणसाला ते जाणवत नाही. पण ज्या दिवशी त्या वेदना जाणवणार नाहीत तेव्हा तो माणूस मेलेला असेल."

समाधान
हे देवा जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचं समर्थ्य मला दे. जी परिस्थितीमी बदलू शकत नाही तिचा स्विकार करण्याची शक्ति मला दे.आणि या दोहोमधला फ़रक जाणण्याची बुद्धी मला दे.
जी परिस्थिती आपण बदलू शकतो ती बदलण्याचा प्रयत्न करणं आणि जी बदलू शकत नाही तिचा स्वीकार करणं म्हणजे समाधानी वॄत्त्ती ।

काही माणसं....................
काही माणसं
पिंपळाच्या पानासारखी असतात
त्याची कीतीही जाळी झाली तरी
मनाच्या पुस्तकात जपुन ठेवावीशी वाटतात
योगदान : ग्रिश्मा काही माणसं
पिंपळाच्या पानासारखी असतात
त्याची कीतीही जाळी झाली तरी
मनाच्या पुस्तकात जपुन ठेवावीशी वाटतात
जवळची नाती
आपण घरातल्या सर्वात महत्वाच्या सर्वात जवळच्या नातेसंबंधाना गॄहीत धरतो, पीळ निरगाठी पडू देतो। जवळ्जवळ चिंध्या होइपर्यंत ताणतो आणि बाहेरच्या तुलनेने अनावश्यक संबंधांना मात्र जपत असतो . ते तुटतील म्हणून घाबरत असतो.
कोमलतेची ताकद
कोमलतेत ताकद असते।पावसाचं पाणी आकाशातून पडतं,माती वाहुन जाते, नध्यांना पूर येतात, भलेभले खडक झिजतात.पाणी वहातच रहातं. कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं.कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. प्रवाहात एखादा खडक आला तर पाणी त्याच्याशी झुंज देत बसत नाही, थांबत नाही. स्वतःची वाट शोधून बाजूने निघुन जातं. ह्या वहाण्यात सातत्य असल्यामुळेच खडक हळू हळू लहान होत जातो आणि प्रवाह रुंदावत जातो.
भिती

एखादी गोष्ट तडीला न्यायची असेल तर अपयशाची भिती मनातून काढून टाकली पाहिजे.याच भीतीने सर्वोत्क्रुष्ट साध्यासाठी प्रयत्न करण्यापासून माणूस दूर राहतो.
चुका सगळेच करतात. कुणी पाहात नसताना त्या करण्याची कला साधली पाहिजे.
तुम्हाला आयुष्याची उजळ बाजू दिसत नसेल, तर किमान जी काळवंडलेली बाजू दिसते, ती तरी पॉलिश करून चकचकवा.
नकार देणे ही कला असेल। पण, होकार देऊन काहीच न करणे, ही त्याहून मोठी कला आहे.
शुन्य
शुन्यालाही देता येते किम्मत
फ़क्त त्यासाठी कुणितरी "एक" होवुन-
शुन्यापुढे उभ राहन्याची
दाखवावी लागते हिम्मत
स्वर्ग
माणसाला छंद हवा. स्वप्न हवीत. पुरी होनारी किंवा कायम अपुरी राहनारी. त्यातुन तो स्वत:ला हरवायला शिकतो. हे हरवन सापडण प्रत्येकाच नीराळ असत. हरवन्या सापडण्याच्या ह्या जागा पती पत्निच्या एकच निघाल्या तर संसारात "स्वर्ग" उतरतो.
-- वपुर्जा- व.पु.काळे.
अत्म आनंद
आत्म-बलच ढग जस आपल्याला स्वता:तुनच बाहेर काढावा लागतो तसच आत्म-आनंदाच ही आहे,तो ही आतुनच यावा लागतो.
- हसरी किदानी

No comments:
Post a Comment