आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, September 03, 2007

आज संध्याकाळी
तिची-माझी भेट ठरली
वाट तिची बघण्यात
क्षण युगे भासली

उगवत्या चंद्रा बरोबर
ती पण आली
माझी नजर पडताच
मनोमनी लाजली

आमच्या प्रिती सारखी
बहरली रातराणी
दिल्या-घेतल्या वचनांना साक्षी
क्षितिजावरची चांदणी

लक्ष चांदण्यांचे तेज
एका चंद्राने झाकोळले
तीच्या एका स्पर्शाने
देहभान हरपले

मदहोष करणारे क्षण
हातात पकडायचे होते
मनातल्या चोर कप्प्यात
जपुन ठेवायचे होते

निरोपाची वेळ येताच
मन उदास झाले
बेचैन मनाला पुढच्या
भेटीची आस लागे

-- हेमंत मुळे

No comments: