आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, September 07, 2007

फुलांनी अता चूर लाजून व्हावे अशी गोड तू
निशेने अता मंद गंधात न्हावे अशी गोड तू

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता,
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू

वर्षावे ढगांनी हळूवार आता तुझ्या अंगणी,
नभाने तुला पाहताना झुकावे अशी गोड तू

नव्या आसमंती प्रकाशीत होतो कसा सूर्य हा,
जगाचे नवे आज निर्माण व्हावे अशी गोड तू

दिल्या तू मनाला विखारी किती यातना,
व्यथेने पुन्हा वेदनेला भुलावे अशी गोड तू

कवी : अद्न्यात

1 comment:

mandarhingne said...

ही नीरज कूलकर्णी ची गझल आहे.. त्याचा दूसरा भागही वाचावा ..

अशी गोड तू.... भाग -२

फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे, अशी गोड तू...
निशेने नव्या मंद गंधात न्हावे, अशी गोड तू...

जसे चातकाला मिळावे जरा थेंब मेघातले,
मनाचे समाधान आकंठ व्हावे, अशी गोड तू...

तहानेत ज्या बालकाने किती आसवे वाहिली,
तुला पाहता त्या मुलाने हसावे, अशी गोड तू...

सदा व्हायची धुंद राधा जशी पाहुनी श्रीधरा,
हरीने तसे धुंद होऊन जावे, अशी गोड तू...

कशाला अशी आर्तशी भैरवी आळवू मी पुन्हा
नवे सूर आता मनाचे जुळावे, अशी गोड तू...

- निरज कुलकर्णी.