आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, August 14, 2007

““ माय ””

याचा साहेबी दिमाख,
घरी फाटक्यात माय.
इथे गाडीतं फिरणे,
तिथे अनवाणी पाय.

नळ पाण्याचा चालतो,
इथला चोवीस तास.
एक थेंब पाण्यासाठी,
तिथे लागतात फास.

याची अस्तरी नाजुक,
नाही सोसत उन्हाळा.
मायमाऊलीचा जीव,
झेले मरण अवकळा.

यांचा कुत्रा पांघरे,
मखमालीची चादर.
माय आसवे पिऊन,
ओढे विटका पदर.

याच्या रंगल्या रात्रीच्या,
ओल्या सुक्या मैफीली.
दीसं राबून राबून,
माय उपाशी निजली.

दीसं राबून राबून,
माय उपाशी निजली. !!!

- अरुण नंदन
(या कवितेने जर काही मने मिळली, काही घरे जोडली तर ती मला पावली असं समजेन)
http://arunnandan.multiply.com/journal

No comments: