आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, July 19, 2007

तो
औंदा लगीन करायच न्हाय ...


कवापासनं घरची मागं माह्या लागल्यात...
अतातरी दोनाच, चार कर की म्हणत्यात..
गड्यानॉ, आसल काय बी करायच न्हाय...
नस्त्या झेंगाटात आडकायचं मला न्हाय..
....................................औंदा लगीन करायच न्हाय.

कुठं राव त्या बायकांच्या नादी लागता...
रोज रोजची कटकट न वटवट, आयला...
ह्ये कर, त्ये आन् रोज मग मरान हाय...
ह्याला बघ,त्याला ने रोजचं ग्रहान हाय...
...........................म्हणून औंदा लगीन करायच न्हाय.

म्या महनतो, भाजी न भाकरी जळाली...
तरी..म्हणावं लागतं काय मस्तच हाय...
मोकळा फिरता येणार न्हाय..नि गावच्या
पोरीकडं बी दिलखुलास बघता येणार न्हाय...
..........................म्हणूनच औंदा लगीन करायच न्हाय.

बस का, यावर थोडा च भगणाराय सगळं..
त्यानंतरच 'लचांड' मग मागचकी लगतय...
बा ह्ये घे,बा त्ये घे एकत आन् करत करत
म्हातरपण पण मग हळूहळू सराय लागतय...
..............आन् मग म्हणूनच औंदा लगीन करायच न्हाय.


झाकच की, मामाच्या शालीशीच लगीन ठरतय..
बघताय काय आसं? तिच्यात माहा जीव हाय..
वर ज्ये काय म्हनालय़,.. त्ये इसारा की राव....
माणूस बी चुकतोच की कधी, का खाताय भाव?
.....................इचार करतोय औंदा लगीन करावं की काय?

नाय, तसं न्हाय...तिचं नखरं सोशीन म्हणतो....
जळकी भाकरी डोळेझाकून घशाखाली उतरवतो....
गावच्या पोरिमधी.... नाहीतरी ठेवलयच काय?
म्हातारपनाला आपलीच पोरं असणार की न्हाय?
....जाऊ द्या सगळेच म्हनत्यात, तर औंदा लगीन करणार हाय.....

ती

आत्याचा बाळ्या न्हाई न्हाई म्हणत व्हता..
मी म्हणते आत्ता तयार ह्यो झालाच कसा?
मला काही केल्या काहीच सुचत न्हाई आता...
ह्याला आठवलीच कुठून न्हाई ती आवदसा....
.......त्याचं मारू द्या, पण मला औ दा लगीन करायचं हाय.

आकलेचा कांदा आन् डोक्यात बटाटं हाय...
तोंडाचं टकसाळ कधी बंदच व्हत न्हाय...
सालेत हा जायचा आवसेला न पूनवेला
गुर्जिन बी ह्याला राम राम केलेला हाय...
............त्याचं सोडा, पण मला औदा लगीन करायचं हाय.

काम ना धंदा आन् बोम्बालत गावभर फिरतो...
मायचं न बाचं रोजच जोडं, ह्यो पोटभर खातो..
एवढ्यावर बी त्याचं भागत न्हाय की काय ?
पोरींच्या श्या बी खाण्यात हा पटाईत हाय...
.......पण करावं काय? मला तर औदा लगीन करायचच हाय.

चार भनींकड बघून, मायचं डोळ आटतच न्हाय..
आन् बाचं काही केल्या कराज पण मिटत न्हाय...
आत्याशिवाय घराचं आमच्या पान बी हालत न्हाय
ह्याच्या शिवाय मला आता दुसरा पर्यायच न्हाय...
..............................म्हणून औदा लगीन करायचं हाय....

रेणुका@ एक झोका....चुके काळजाचा ठोका...

No comments: