नशीबही साला कधी कधी अजब खेळ खेळते
त्याच्या या खेळापुढे मनातले निर्मळ प्रेमही हतबल होते
डोळ्यातले सदा बोलके भावही तेव्हा
मग होतात जसे नकळते
मनातले शब्दांचे बोलकं वादळ मग ओठांशी
य़ेउन अचानक शांत होते
य़ा नशीबाच्या खेळात मनात
एक वेदनेची लखलखती वीज चमकते
ती वेदना मग दुख:रुपी पावसासोबत रात्रभर बरसते
त्या पावसात मनाच्या इच्छांना ती चिंब भिजवते
एक क्षणिक दुख: ते आयुष्यभर साथ देते
कधी न मिटणा-या दुराव्याने ते
काळजा शेजारीच आपला संसार थाटते
आयुष्यात जशी कधी न सरणारी अंधारी रात्रच उरते
ती रात्र सोबत गर्द काळोख घेउन येते
अंधाराला तिथे निराशाही बिलगते
त्या एकट्या जिवाच्या सोबतिला फ़क्त न सुटलेली गणिते
एका तुटक्या मनाला याशीवाय
दुसरं कुठे काय मिळते
सचिन काकडे
No comments:
Post a Comment