आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, July 19, 2007

तु मला आजवर खुप काही दिलंस
झोपेत होतो मी आजवर तु मला जाग केलस
तु मला ऊंच आकाशात स्वछ्चंद उडायला शिकवलस
चंद्र ता-यांची सहल घडवत तु मला स्वर्गाच रुप दाखवलस
सोनेरी स्वप्न दाखऊन तु प्रेम करायला शिकवलस

तु मला आजवर खुप काही दिलंस
तुच तर स्वप्नांचे आभाळ दिलंस
सप्तरंगी आसमंतात मला सोबत घेउन
तु एक नवं जग दाखवलस
पण नंतर तुच पंख छाटुन माझे
मला जमीनीवर आणलस

तु मला आजवर खुप काही दिलंस
बंधने सगळी तोडुन तु मला जगायला शिकवलस
ज्या हत्यारने छाट्लीस बंधने तेच
हत्यार तु माझ्या काळजावरही चालवलस
ज्या पानांवर लिहिणार होतो
मी प्रेमकहाणी तु त्यांनाही पेटवलस

तु मला आजवर खुप काही दिलंस
तुच तर रडायला शिकवलस
कोरडे होते जे डोळे माझे
आसवांनी त्यांना तु भिजवलस
माझ्या निस्तेज मनाला तु नव तेज दिलस
ऊदास मनाच्या पोकळीला तु वेदनांनी भरलस


तु मला आजवर खुप काही दिलंस
तुच तर मला एकट्याने जगायला शिकवलस
जी बंधने तोडलीस त्याच बंधनात
तु मला पुन्हा अडकवलस
मुका होतो जणु आजवर मी
तु मला या शब्दातुन बोलकं केलस

मरता मरता जगत होतो तु
जगता जगता मरायला शिकवलस
झोपेत होतो मी आजवर
तु मला "खरंच" जाग केलस

तु मला आजवर खुप काही दिलंस........

तु मला आजवर खुप काही दिलंस........

सचिन काकडे

No comments: