आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, June 29, 2007

रिस्क (एका तळीरामाला दारु कशी चढते ते वाचा)

दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही
मी संध्याकाळी घरी येतो , तेव्हा बायको स्वंयपाक करत असते.
शेल्फमधल्या भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो
मी चोरपावलाने घरात येतो
माझ्या काळ्या कपाटातुन बाटली काढतो
शिवाजीमहाराज फोटोतुन बघत असतात
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही
कारण मी कसलीच रीस्क घेत नाही.............(१)

वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो
पटकन एक पेग भरुन घेतो ग्लास धुवुन पुन्हा फळीवर ठेवतो
अर्थातच बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो
शिवाजीमहाराज मंद हसत असतात
स्वयंपाकघरात डोकावुन पाहतो ,बायको कणिकच मळत असते,
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही
कारण मी......................................
.....(२)

मी : "जाधवांच्या मुलीच लग्नाचं जमलं का गं?"
ती : "छे! दानत असेल तर मिळेल ना चांगल स्थळ"

मी पटकन बाहेर येतो , काळ्या कपाटच्या दाराचा आवाज होतो
बाटली मात्र मी हळुच काढतो , वापरात नसलेल्या फळीच्या मोरीवरुन ग्लास काढतो
पटकन पेगचा आस्वाद घेतो.........बाटली धुवुन मोरीत ठेवतो
काळा ग्लास पण कपाटात ठेवतो
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही
कारण मी...........................................(३)
मी : "अर्थात जाधवांच्या मुलीच अजुन काही लग्नाच वय झाल नाही?"

ती : "नाही का ऽ ऽ य ! अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीय म्हणे.......!

मी : (आठवुन जीभ चावतो) अच्छा ........ अच्छा.....

मी पुन्हा काळ्या कपाटातुन कणिक काढतो
मात्र कपाटाची जागा अपोआप बदललेली असते
फळीवरुन बाटली काढुन पटकन मोरीत एक पेग भरतो
शिवाजीमहाराज मोठ्याने हसतात , फळी कणकेवर ठेवुन शिवाजीचा फोटो धुवुन मी काळ्या कपाटात ठेवतो ,
बायको गॅसवर मोरीच ठेवत असते
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही
कारण मी......................................
.....(४)

मी : (चिडुन) " जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापुन टाकीन तुझी !"

ती : "उगीच कटकट करु नका.बाहेर जाऊन गप पडा."

मी कणकेतुन बाटली काढतो , काळ्या कपाटात जाऊन एक पेग भरतो
मोरी धुवुन फळीवर ठेवतो , बायको माझ्याकडे बघत हसत असते
शिवाजीमहाराजांचा स्वयंपाक चालु असतो
पण या जाधवांचा त्या जाधवांना पत्ता लागत नाही
कारण मी............................................(५)

मी : (हसत) " जाधवांनी घोडीशी लग्न केल म्हणे"

ती : (ओरडुन) "तोंडावर पाणि मारा ऽ ऽ"

मी परत स्वयंपाक घरात जातो , हळुच फळीवर जाऊन बसतो
गॅसही फळीवर्च असतो , बाहेरच्या खोलीतुन बाटल्यांचा आवाज येतो
मी डोकावुन बघतो..... बायको मोरीत दारुचा आस्वाद घेत असते
या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही
अर्थात शिवाजीमहाराज कधी रिस्क घेत नाहीत
जाधवांचा स्वयंपाक होईपर्यत. . . . .
मी फोटोतुन बायकोकडे बघत हसत असतो....
कारण मी कधीच रिस्क घेत नाही.......................(६)

-तळीराम

No comments: