आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, June 26, 2007

सुगंधी झाड
ती कॉलेजला येताना
मोग-याचा गजरा माळुन यायची
सुगंधाचं झाड हौउन
कॉलेजभर दरवळायची

तिच्या गज-यातली बंडखोर फ़ुलं
इथे तिथे सांडायची
मलाही सवयच लागली होती
सांडलेली फ़ुलं जमवायची

वाटायचं त्या बंडखोर फ़ुलांना
तिचीच आतुन फ़ुस आहे
माझ्यासाठी फ़ुलं सांडण्यात
नियतीचा काही डाव आहे

कॉलेज संपेपर्यंत हे असंच चाललं
मग माझं सुगंधी झाड कुठेतरी हरवलं
कॉलेज संपल्यावर आपापल्या वाटेनं गेलो
आपापल्या जगात आम्ही छान रमलो

परवा सहज मी जुनी डायरी उघडली
डायरीत जपुन ठेवलेली फ़ुलं सापडली
माझ्या भावनांसारखीच फ़ुलंही सुकलेली
पण वाळक्या फ़ुलांत तिची आठवण सुगंध बनुन राहीलेली


1 comment:

Anonymous said...

Nice Blog! and Nice poems too.