आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, June 12, 2007

तू आणि तुझे बोलणे
शब्द जमीनीवर सांडले
पक्षी होऊन कानांनी माझ्या
सारे पटापटा टिपले.

तू आणि तुझे बोलणे
कधी मऊ कधी अलगद
मोर पिसार गालावरुन
जसा फिरावा सहज.

तू आणि तुझे बोलणे
फक्त डोळ्यांनी
मग भांडावे माझ्या डोळ्यांशी
माझा कानांनी.

तू आणि तुझे बोलणे
संगीताचा नवा तरंग
मन माझे वेडे
त्यावर नाचण्यात दंग.

तू आणि तुझे बोलणे
कधी लाडीक कधी हट्टी
हॄदयाची होते मग
माझ्या मनाशी कट्टी.

तू आणि तुझे बोलण
माझ्यावर रागावले
त्या दिवशी कान माझे
कायमचे हरवले.

तू आणि तुझे बोलणे
आता फक्त आठवण
बडबडणार्‍यांच्या दुनियेत
माझी शब्दांसाठीची वणवण.

No comments: