आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, June 26, 2007

तु समजु नाही शकलीस अन मी बोलु नाही शकलो
माझ्या डोळ्यात लपवलेले ते गुपित
त्या माझ्या मनातल्या भावना
ती नकळतशी जाणीव
तु समजु नाही शकलीस अन मी बोलु नाही शकलो

माझ्या स्वप्नात बनलेली एक कहानी
ती सांगत होतो तुला मी डोळ्यांनी
जीला शब्दात उतरवु नाही शकलो
तु समजु नाही शकलीस अन मी बोलु नाही शकलो

प्रेमाचे ते चार क्षण
आता हळु हळु बदलु लागले
त्या कहानीतले स्वप्न अधुरेच राहीले
कधी न सांगीतलेलं
कधी व्यक्त न केलेलं
तु समजु नाही शकलीस अन मी बोलु नाही शकलो

तुला निरोप देतना माझा जीव जात होता
तो जाणारा जीवही तुझ्यातच होता
तु अशी दुर नको जाऊस हे आसवांतुन सांगत होता
ते तु समजु नाही शकलीस अन मी बोलु नाही शकलो

एक दिवस असाच मी या दुनियेतुन गेलो
तुला विसयायच्या प्रयत्नात पुरता संपलो
मी गेल्याची बातमी
तुला कळाली नाही
अनं मी कळवु नाही शकलो

-- सचिन काकडे

No comments: