आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, June 26, 2007

हल्ली तसं बाळुचं बरं चललं होतं
केसात चांदी अन पोट थोडं सुटलं होतं
वाढलेलं वजन बाळीनं चारचौघात काढलं होतं
बाळुने मात्र नेहेमी बाळीला वेड्यात काढलं होतं

बाळुनेही बाळीला वजनावरुन चिडवलं होतं
डाएट जिम वगैरे नाटक केव्हाच करुन झालं होतं
वजन मात्र दोघांचं वाढता वाढता वाढत होतं
कंटाळुन मग बाळीनं पोहायचं खुळ काढलं होतं

तिला शिकवायचं म्हटल्यावर त्याच्या पोटात गोळा आला
बाळीही काही कमी नव्हती तिने आता हट्टच धरला
चार दिवस झाले तरी बाळु पोहायला शिकवेना
नवाकोरा पोहोण्याचा पोषाख बाळीला घालायला मिळेना

बाळी मुळातच हुषार तिने मग एक युक्ती केली,
कॉलनीतल्या मैत्रिणींना पोहायची कल्पना तिने सुचवली
बाळुच्या शिकवणीची तिनेच मुद्दम जाहीरात केली
मैत्रीणींना शिकवायचं म्हटल्यावर बाळुचीही नियत बदलली

दिवस ठरला पंचांग बघुन वेळ देखील ठरली
सुंदर सुंदर स्वप्नं बघत बाळुची रात्र सरली
वेळ होताच पोहायची, बाळुचा जीव खालीवर झाला
पोहोण्याच्या पोषाखात त्यांना पाहुन बाळु धन्य झाला

"बाळासाहेब बेस्ट लक" शेजारचा जोशा कुचकट बोलला
गणपती बाप्पा मोरया म्हणत बाळुने पटकन सुर मारला

पाण्यात पोहता पोहता त्याने बाळीला पाण्यात बोलावले
बाळीचा काही धीर होइना तिने मैत्रिणीला ढकलले
मैत्रिण सुद्धा हुषार तिने दुसरीला नेमके ओढले
दोघी पडल्या बाळुच्या अंगावर बाळुचे कंबरडे मोडले

एकी ने धरली पाठ, धरला एकीने गळा
मेलो बुडलो वाचवा वाचवा बाळु ओरडु लागला
मन्नु नावाचा ट्रेनर होता तिथे त्याने हे पाहिले
उडी मारली पटकन त्याने तिघांना ओढुन काढले

खुष झाल्या बायका सगळ्या हवा गेली बाळुची
तिथल्या तिथेच बंद पडली शिकवणीही बाळुची
बाळुची हौस भागली तरी बायका पोहायला शिकताहेत
मन्नुबुवा मस्त मजेत पोहोण्याचे धडे देताहेत

लोक साले कुचकटच काय नको नको ते बोलाअहेत
म्हणतात बाळुने झाड लावलं मनोबा फ़ळं खाताहेत

-- मन्नू

No comments: