आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, June 22, 2007

शब्द माझे असतात उनाड वा-यासारखे
अन कधि रिमझिमत्या श्रावणसरिसारखे
दोन क्षण घेतो विसावा कुणी कधि येथे...
मग होतात शब्द माझे खळखळणा-या झ-यासारखे...

शब्दांना जुळायला वेळ लागत नाही
शब्दांना कळायला वेळ लागतो
शब्दांशी खेळताना
मनाशी भावनांचा खराखुरा मेळ लागतो

शब्दांशी शब्द जुळतीलच असं नाही
शब्दांनी शब्द पेटतीलच असंही नाही
तरीही शब्दांना बांधावच लागतं
भावनांचा खेळ खेळताना शब्दांच्या कुशीत शिरावचं लागतं

शब्दांशी मैत्रि असावी
म्हणजे हवं तसं जगता येतं
जग रडत असलं बाहेर
तरी एकट्याला हसता येतं...

असं वाटतं आता शब्दांचीही साथ सुटेल
आणी मी पुरता एकटा होईल....
'आता कुणासाठी जगतोयसं?' असं म्हणत...
आयुष्य क्षणोक्षणी चटका देईल...

आयुष्यभर चातक बनुन
मी पावसाची वाट पाहीली
पण...या वाळवंटात मात्र
फ़क्त माझीच पापणी वाहीली...

अशा धुंद श्रावणात बेधुंद रात येते
छेडीत सप्तसुर थंडी गुलाबी गीत गाते
शरीरे दोन जरी...सूर त्यातुन एकच उमटे
मी गंध तुझा...तु रातराणी... मज सोडुन का जाते?

तु समोर असलीस की
सा-या जगात मी
अन तु गेल्यावर मात्र
शोधात माझ्याच मी

सांज ढळली...तारा तुटला...
मनात आशेचा एक अंकुर फ़ुटला...
समजावले मनास मीच
अरे वेडया...
जगणे त्यास असह्य झाले म्हणुन तोही निखळत सुटला...

एकदा तुला म्हटलं होतं
आयुष्यभर तुझी साथ देईल...
मला कुठं ठाऊक होतं तेव्हां
आयुष्यचं माझी साथ सोडुन जाईल

जखम झाली तरी
तीला मी वाहु देत नाही
माझी जखम मी
जगाला पाहु देत नाही

तुझ्या राज्यात मला थोडीशी जागा दे
राजा म्हणुन नको
पण....प्रजा म्हणुन तरी
मला तुझ्या राज्यात घे

कुणाला भेट म्हणुन काही दिलं की
त्याच्यावर मी माझं नावं टाकत नाही
कुणीतरी मला 'ऊगीचच' आठवावं
असं मी मुळीच वागत नाही

जुळले काही शब्द
पुन्हा चार ओळी झाल्या
नसलीस तु जरी
आठवणी तुझ्या तुलाच घेऊन आल्या...

तु फ़क्त सोबत रहा मित्रा
हे आयुष्य असचं जगुन घेईल...
मागितलंस कधि तर
सारं जगही जिंकुन तुला देईल...

सुर्य ढळला....आता चंद्र येईल
अन सबंध आसमंत त्याच्या मंद प्रकाशात न्हाऊन जाईल...
माझ्याही शब्दांना मग उधान येईल
आठवुन तुला...
अशीच एखादी कविता पुन्हा जन्म घेईल...

उद्याची वाट कशी पाहु?
मी तुला कसे समजावु?
उद्याचा भरवसा नाही सखे...
चल आजच जगुन घेऊ....


आभाळास पेलुन घेइल
मी वादळास झेलुन घेइल
तु फ़क्त साथ रहा..
क्षणभर मृत्युशीही खेळुन घेइल..


अशी वरवरची हाक नकोय
मनापासुन मला साद घाल...
अवघं आयुष्य तुला देईल
एकदा माझ्या भावनांना हात घाल

-- संदिप सुरळे

No comments: