हे प्रेमाचं असच असत..
थोडसं अवघड अन थोडं सोप असत..
पण एकदा जमायला लागलं की
ते आपोआपच घडत असतं
तुझ्या माझ्या प्रेमाची
हि अखंड कथा अशीच चालु राहील...
थांबली लेखनी जरी..
तरी कथानके तशीच जिवंत राहील...
माझ्या मनात काय आहे,
ते तु अचुक ओळखतेस ..
ओळखूनी मग असे
तु मला पुन्हा पुन्हा तेच का विचारतेस !
प्रेमात असं थांबायच नसतं,
मागे न वळता पुढेच चालायच असतं..
ऎकमेकांची साथ घेऊन
जग जिंकायचं असतं
किती वाट पहायची ,
तुझ्या होकाराची ?
संपत आलीये आता
लेखनी माझ्या जिवनाची
कितीदा ठरवलय ,
प्रेमावर काही लिहायच नाही,
पण मी तरी काय करणार..
त्या लेखनीला कागदावरच प्रेम व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही...
आता तरी हो बोल..
तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल..
कसं सांगू तुला सजनी
तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल !
चांदण्याची सवय ,
खुपच असते भारी..
चांदरातीच्या मिलनाला..
उगाचच त्यांची लुडबुडती हजेरी....
मिलनाच्या रातीला..
सहवास तुझा साथीला..
मग काय हवय अजून,
या मधुचंद्राच्या रातीला...
मधूचंद्राचे किस्से
सहसा कोणाला सांगत नाही..
पण त्या क्षणासारखे
अजब मिलन मला कुठेच दिसले नाही
ह्रुदयातुन एक स्पन्दन आले,
चेहरया वरचे भाव बदलले..
ह्रुदयातील त्या स्पन्दनाला,
प्रेम हे नाव मिळाले....
तुझ्यावर लिहणं म्हणजे
आकाशातील तारयाना मोजण..
किती अवघढ असतं हे खर प्रेम
शक्य नसतं ते सहजासहजी मिळंण....
कोणाला सांगाव्यात
प्रेमाच्या व्यथा!
सगळ्यांच्याच नावावर,
व्यथांची गाथा।
तीच्या होकारासाठी
करावी लागली तारेवरची कसरत...
खरं सांगायच तर ..
प्रेमात असते हिच खरी गंम्मत....
प्रेम कराव आभाळासारख
धरणिला समांतर असणार
सुखदु:खाच अंतर लांघुन
क्षितिजावर मिलन करणार
तुझ्या डोळ्यातले भाव..
मला चांगलच ओळखता...
मग शब्दावाचून बोलण्याचे..
नवीनच खुळ घालतात...
आठवत का तुला...
आपण दोघेच होतॊ रानात..
तु माझी अन मी तुझी
सावली झालो होतो त्या रख्ररखत्या उन्हात...
तु हसलीस की ..
मला हे जग माझं वाटत..
मग मलाही जगताना...
कस ताजं वाटतं...
अन्तरबाह्य तुच आहेस
हेच सत्य जाण
लोका असतील पन्चप्राण
पण तु माझा सहावा प्राण !
अनंत असे शब्द माझे..
सोबतीला सुर तुझे..
राग प्रेमाचा छेडूया..
सजने आजतरी मैफिलीत ..
तु माझी अन मी तुझा होऊया....
स्पर्श तुझा होतॊ..
अन चेतनांचा कारंजा उडतो..
नेहमी तु जवळी येता..
मग उगाच काळजाचा ठोका तुझ्याकडेच वळतो...
लुकलुकत होते आकाशी तारे
अन नकळत घडले होते सारे..
त्या प्रेमाच्या निशा-मिलनात..
हे अजब होते सारे न घडणारे
टिमटिमणारया दिव्यामधे..
तुझं दिसलं मला सुदंर रुप..
लक्ष तुझ्याकडे वळालं म्हणून..
दिव्याने ही घेतलं तेजस्वाचं हूरूप...
थोडसं अवघड अन थोडं सोप असत..
पण एकदा जमायला लागलं की
ते आपोआपच घडत असतं
तुझ्या माझ्या प्रेमाची
हि अखंड कथा अशीच चालु राहील...
थांबली लेखनी जरी..
तरी कथानके तशीच जिवंत राहील...
माझ्या मनात काय आहे,
ते तु अचुक ओळखतेस ..
ओळखूनी मग असे
तु मला पुन्हा पुन्हा तेच का विचारतेस !
प्रेमात असं थांबायच नसतं,
मागे न वळता पुढेच चालायच असतं..
ऎकमेकांची साथ घेऊन
जग जिंकायचं असतं
किती वाट पहायची ,
तुझ्या होकाराची ?
संपत आलीये आता
लेखनी माझ्या जिवनाची
कितीदा ठरवलय ,
प्रेमावर काही लिहायच नाही,
पण मी तरी काय करणार..
त्या लेखनीला कागदावरच प्रेम व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही...
आता तरी हो बोल..
तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल..
कसं सांगू तुला सजनी
तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल !
चांदण्याची सवय ,
खुपच असते भारी..
चांदरातीच्या मिलनाला..
उगाचच त्यांची लुडबुडती हजेरी....
मिलनाच्या रातीला..
सहवास तुझा साथीला..
मग काय हवय अजून,
या मधुचंद्राच्या रातीला...
मधूचंद्राचे किस्से
सहसा कोणाला सांगत नाही..
पण त्या क्षणासारखे
अजब मिलन मला कुठेच दिसले नाही
ह्रुदयातुन एक स्पन्दन आले,
चेहरया वरचे भाव बदलले..
ह्रुदयातील त्या स्पन्दनाला,
प्रेम हे नाव मिळाले....
तुझ्यावर लिहणं म्हणजे
आकाशातील तारयाना मोजण..
किती अवघढ असतं हे खर प्रेम
शक्य नसतं ते सहजासहजी मिळंण....
कोणाला सांगाव्यात
प्रेमाच्या व्यथा!
सगळ्यांच्याच नावावर,
व्यथांची गाथा।
तीच्या होकारासाठी
करावी लागली तारेवरची कसरत...
खरं सांगायच तर ..
प्रेमात असते हिच खरी गंम्मत....
प्रेम कराव आभाळासारख
धरणिला समांतर असणार
सुखदु:खाच अंतर लांघुन
क्षितिजावर मिलन करणार
तुझ्या डोळ्यातले भाव..
मला चांगलच ओळखता...
मग शब्दावाचून बोलण्याचे..
नवीनच खुळ घालतात...
आठवत का तुला...
आपण दोघेच होतॊ रानात..
तु माझी अन मी तुझी
सावली झालो होतो त्या रख्ररखत्या उन्हात...
तु हसलीस की ..
मला हे जग माझं वाटत..
मग मलाही जगताना...
कस ताजं वाटतं...
अन्तरबाह्य तुच आहेस
हेच सत्य जाण
लोका असतील पन्चप्राण
पण तु माझा सहावा प्राण !
अनंत असे शब्द माझे..
सोबतीला सुर तुझे..
राग प्रेमाचा छेडूया..
सजने आजतरी मैफिलीत ..
तु माझी अन मी तुझा होऊया....
स्पर्श तुझा होतॊ..
अन चेतनांचा कारंजा उडतो..
नेहमी तु जवळी येता..
मग उगाच काळजाचा ठोका तुझ्याकडेच वळतो...
लुकलुकत होते आकाशी तारे
अन नकळत घडले होते सारे..
त्या प्रेमाच्या निशा-मिलनात..
हे अजब होते सारे न घडणारे
टिमटिमणारया दिव्यामधे..
तुझं दिसलं मला सुदंर रुप..
लक्ष तुझ्याकडे वळालं म्हणून..
दिव्याने ही घेतलं तेजस्वाचं हूरूप...
No comments:
Post a Comment