आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, May 29, 2007

काही उखाणे

चांदीच्या ताटात जीलबीचे तुक्डे
घास भरव्ते मेल्या थोबाड कर इकडॆ

शंकराच्या देवळात करत होते आरती
हे गेले वरती नी मी राहीले खालती

ईतीहासाच्या पुस्तकाला भुगोलाचे कव्हर
----चे नाव घेते ----ची ल्व्हर

तिकडुन आला म्हशिचा घोळका
तिकडुन आला म्हशिचा घोळका
त्यात माज़्या ___ला ओळखा

नावा-गावाची काय बिशात,
--राव आहेत मज़्या खिशात!!

पहिली सोनी, दुसरी मनी, तिसरी जनी
सोडल्या तिघीजणी नी झालो ठकीचा धनी

अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे मोठी कुणाकुणाचे नाव घेऊ?

इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले ग पाय
गणपतराव अजुन आले नाहीत,पिऊन पडले की काय?

हिमालयातल्या सगळ्या हिमराशी भग्न
प्रेम केले ह्रितिकवर पण ***** रावांशी लग्न!

सिलिन डियॉन गाते तो पिक्चर टायटॅनिक
माझी ***** गाते तेव्हा सगळेच पॅनिक!

बेगॉन स्प्रे मारल्यावर चंचल झाली झुरळे
साड्यांचा सेल पाहून ***** चा जीव हुरळे!

भटजींच्या कपाळावर चढली चंदनाची पुटे
***** राव दारू ढोसून बघा बरं गेले कुठे?

*** स्वप्न पाहतेय,
***राव हनीमूनला नेतील
तरीही पत्रिकेत लिहिलंय,
`सगळे विधी' कार्यालयातच होतील...!!

बशीत बशी चायना बशी ,
माझी बायको सोडुन बाकी सगळ्या म्ह्शी।

ज़ुन ज़ुन ज़ुन्यात,
उभी होते मेण्यात,
कंचुली अंगात,
गुलाल भांगात,
गुलाल फटफटीत,
लवंगा मुठीत,
मुठीतल्या गाठीत,
अडकित्त्याला तीन तारा,
--- राव बसले पालख़ीत,
मी घालते शेल्याने वारा!

अमेरिकेचे प्रेसिडेण्ट आहेत बुश
सुंदर मुलगी दिसताच **** राव एकदम खुष !!

***रावांची थोर्वी मी सांगत नाही
कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लाफडी ते विचारू नका राव !!

सचीनच्या बॅत ला करते नमस्कार वाकून
***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून

सोन्याच्या तबकात टेऊ दे निरांजनाची वात
.... रावांच्या आयुष्यात येऊ दे मंगलमय सुखाची लाट

वाकडी तिकडी बाभुळ, तिच्यावर बसला होला
सखा पाटील मेला म्हणून तुका पाटील कॆला

सासर च्या गावी पेर ले मी गहू
अजुन लग्न नाही ठरले माकडा , नाव कुणाचे घेऊ


No comments: