आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, April 24, 2007~:~ मैत्रिण ~:~
मैत्रिण माझी हट्टी गं
उन्हाळ्याची सुट्टी गं
मैत्रिण माझ्या ओठांवरची
कट्टी आणिक बट्टी गं !

मैत्रिण रुमझुमती पोर
मैत्रिण पुनवेची कोर
मैत्रिण मैत्रिण कानी डूल
मैत्रिण मैत्रिण वेणीत फूल !

मैत्रिण मांजा काचेचा
हिरवा हार पाचूचा
बदामाचे झाड मैत्रिण
बदामाचे गूढ मैत्रिण

मैत्रिण माझी अशी दिसते
जणू झाडावर कळी फुलते
ओल्या ओठी हिरमुसते
वेड्या डोळ्यांनी हसते

मैत्रिण माझी फुलगंधी
मैत्रिण माझी स्वच्छंदी
करते जवळिक अपरंपार
तरीही नेहमी स्पर्शापार

मैत्रिण सारे बोलावे
मैत्रिण कुशीत स्फुंदावे
जितके धरले हात सहज,
तितके अलगद सोडावे

मैत्रिण माझी शब्दांआड लपते,
हासुनिया म्हणते-पाण्याला का चव असते
अन्‌ मॆत्रिणीस का वय असते !
मैत्रिण थोडे बोलू थांब
बघ प्रश्नांची लागे रांग

दु:ख असे का मज मिळते
तुझ्याचपाशी जे खुलते !
मैत्रिण माझी स्वच्छ दुपार
मैत्रिण माझी संध्याकाळ

माझ्या अबोल तहानेसाठी
मैत्रिण भरलेले आभाळ !


No comments: