प्रत्येकाच्या मनात एक कवी लपलेला असतो,
व्यक्त करण्याचा रस्ता मात्र मनातच वळलेला असतो !!!
सांगता येत नाही असे नाही,
पण उगाचच अबोल राहतात.....
प्रत्येकजण ईथे फक्त,
मनातच गात राहतात...
भावना व्यक्त करायला........ईथे जो तो बुजतो !! पण प्रत्येकाच्या मनात.......
बहुतेकांना जमत नाही,
शब्दांच गाठोडं बांधायला.........
खुप खुप वेळ लागतो,
दोन ओळी सुध्धा मांडायला........
निराश होवुन कंटाळुन तो पुढे न लीहिता खचतो !! पण प्रत्येकाच्या मनात........
जरी ज़मली कवीता पुर्ण,
तरी दाद थोडी मिळायला हवी............
थोडा पाउसही चालेल त्याला,
पण मनात "बि" रुजायला हवी...........
एकदा का तो मनातुन बहरला की अमॄत होवुन बरसतो !!
कारण.......प्रत्येकाच्या मनात एक कवी लपलेला असतो..............
No comments:
Post a Comment