आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, April 26, 2007

मराठी फुसक्या

कोण म्हणतं व्यसन सुटत नाही मी आत्तापर्यंत शंभर वेळा सोडले आहे.

बुडणा-याला काढताना मध्येच सोडून द्यावं, जगण्या आणि मरणातील अंतर कळण्यासाठी.

समोरचा आपल्याला सतत पाहतो आहे हे त्याच्याकडे सतत पाहिल्याशिवाय कळत नाही

माकडांपासुन माणुस बनला असेल तर...... अजून माकडं शिल्लक कशी?

पुण्यात सिग्नलची व्याख्या: करमणुकीसाठी रस्त्यात लावलेले उघडझाप करणारे तिन रंगीत दिवे

लाईन मारताना जपुन! तारा जुळल्या तर ठीक नाहितर कोळसाच

नुसती वाट पाहुन हाती येते ते म्हातारपण

No comments: