आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, July 27, 2007

तिच ती माझी

--विराज

कॉलेजात जाताना, पहिल्यांदाच ती मला भेटली

लाल रंगाच्या कड्यांमध्ये, तिची कळी अधिकच खुलली

बहिण बरोबर असतानाही, मी तिच्याकडे बघत बसलो

काय, कसे कूणास ठाऊक? मी तिच्या प्रेमात पडलो।

दिवसातून किती वेळा, तिचं माझ्या बिल्डिंगजवळून जाणं

आणि जेव्हा जेव्हा चान्स मिळेल, तेव्हा तेव्हा माझ तिला बघणं

हळु हळु तिलाही, माझं प्रेम उमगलं;

मग तिची जवळीक वाढून, आमचं प्रेम जुळलं

एकमेकांच्या साथीत आम्ही कोठे कोठे नाही फिरलो

स्टेशनपासून बिल्डिंगपर्यंत, येता जाता तिच्या कुशीतच शिरलो

तिच्याबरोबर पालथं घातल, जयराजनगर, योगीनगर;

अगदि सोडलासुद्धा नाही, रोड चंदावरकर.

कधी-कधी मात्र, ति वेळेवर नाही यायची

बिल्डिंगखाली फेऱ्याघालून, आम्ही मात्र तिची वाट बघायची

मग उशीरा आल्यावर, तिचं लांबुनच दिलगिरी व्यक्त करणं

आणि माझं मोठ्या मनानं, हसतं तिला माफ करणं .

माझ्यासारखेच तिची वाट बघणारे होते अनेकजण

कारण तिही तशीच होती; साधी,भाव न खाणारी आयटम नंबर वन

म्हणून कॉलेजसंपेपर्यत तिच्याबरोबर फिरायचो

तिच्या हातात हात घालून, तिला फुलासारखे जपायचो.

कॉलेज संपल्यावरही ती सदैव राहते आठवत

मला पाहून लांबूनच, डोळ्यांनी ती असे खुणवत

तिचं मनमोहक रुप अजुनही काळजात ठेवतो

म्हणूनच तिला विसरायचं ठरवतो आणि नेमके तेच विसरतो.

जॉब मिळाल्यानंतर मात्र, माझ्या मनात कायम असेल भिती

आपल्या दोघांच्या भेटी, होतील की नाही दिवसराती

कारण माझ्या वेळेचं भान तू राखशील कशी?

तरीहि कठिणचं आहे, तुला सोडून जाणं दुसऱ्यापाशी.

भेटी झाल्या तरी, ह्रदयावर तुझं प्रतिबिंब कायमचं कोरलेलं

मनाच्या एका कोपऱ्यात, तूझं नाव सदैव जपलेलं

तिचं नाव सांगू की नको, मला लाज वाटते

पण प्रेमचं ते, कोणावरही केलं तरीहि लपत नसते.

म्हणूनच ठरवलं तिचं नाव सांगून टाकायचं

झालं ते झालं, आता नाही घाबरायचं

तिच माझी बिल्डिंगखाली येणारी सखी सवंगडी

तिच ती १६ क्रमांकाची बस, पोस्ट ऑफिस ते चिकूवाडी.

चूक

एक सुंदरी सलूनमधल्या खुर्चीवरती भल्या दुपारी
येउन बसली अगदी अलगद, सोडून केस तिचे सोनेरी

मिटून चष्मा काळा बसली पायावरती पाय चढवुनी
वेध घेतला भोवतालचा एक दोनदा मान वळवुनी

नजर झुकवुनी पदर सारखा करून झाला मग हाताने
जणू पंखाची पिसे सारखी करावी कोण्या पक्षाने

केस कापले अनेकदा पण समाधान काही लाभेना
आरशामध्ये बघून झाले पण जीवाला चैन पडेना

म्हणतील सख्या किती कापले केस अता मी कैसे जावे -
काय करावे आता याचे बाईंना कैसे उमजावे?

तोच चलाखी करून न्हावी चूक लपवी लावे गंगावन
रूप नवे पाहून स्वतःचे अन सुंदरी झाली पावन

अधीरतेने हर्षभराने स्पर्धेला अवतरली यक्षिणी
आणि तिच्या केसात अचानक चुकून घुसली एक पक्षिणी

महिला मंडळा मधली जेव्हा संपली स्पर्धा नटण्याची
चिमणीची चिंता कायमची होती मिटलेली घरट्याची

-केशवसुमार

मराठी विनोद
रेल्वेतून प्रवास करताना, श्रीपतराव मोठ्या दिलगिरीने सहप्रवाश्याला म्हणाले, "मला कमी ऐकु येतं एवढं मला ठाउक होतं परंतु आता तर असं वाटतयं की मी ठार बहिराच झालोय, कारण तुम्ही मगाच पासुन बोलत आहात त्यतिल अवाक्षरही मला ऐकु येत नाहीए"। सहप्रवासी गणपतराव म्हणाले, "आपला गैरसमज झालाय. मी बोलत नव्हतो तर चुईंगम खात होतो!"

तिंबूनाना आणि विमलाबाई फ़िरायला गेले होते. वाटेत एका दुकानाबाहेरील पाटिकडे विमलाबाईंच लक्ष गेलं आणि त्या आनंदाने नाचायला लागल्या. कारण त्या पाटीवर लिहलं होतं,

बनारस साडी १० रु.
रेशमी साडी ५ रु.
सुती साडी २ रु.

विमलाबाई तंबूनानांना म्हणाल्या, "आहो लवकर शंभर रुपये द्या. आपण भरपुर साड्या घेऊया!"
तंबूनाना वैतागुन म्हणाले," मुर्ख आहेस! अग ती लाँड्री आहे! साड्यांचे दुकान नाही."

बाई ः एका शेतात आठ बकऱ्या होत्या त्यापैकी चार बकऱ्या कुंपणावरुन ऊड्या मारुन रस्त्यावर गेल्या तर शेतात कीती राहिल्या?
वर्गातला शेतकऱ्याचा मुलगा ः एकही नाही.
बाई ः नाहि कसं? मागे काही उरतीलचं.
शेतकऱ्याचा मुलगा ः बाई तुम्हाला गणित माहीती असेल परंतु बकऱ्यांची माहिती नाही

चिमणराव तक्रार गुदरण्यासाठी पोलिस ठाण्यावर गेले.
म्हणाले, मी जंगलातुन प्रवास करताना माझ्याजवळचे पैसे, घड्याळ, सोन्याची साखळी, इतके सगळे सामान चोरट्यांनी पळवले"
"पण साहेब, मला वाटतं तुमच्याजवळ पिस्तुल होतं." अधिकारी म्हणाला.
"नशिब ते त्यांना सापडलं नाहि।" चिमणराव उत्तरले!

एक महिला आपल्या पाच वर्षिय मुलाला घेउन डॉक्टरांकडे गेली. तपासून झाल्यावर डॉक्टरांनी त्याला विचारलं, "बाळं, तुला नाक किंवा कानाचा काही त्रास होतो का?"
नाक पुसुन बाळ उत्तरला, "हो ना! गंजीफ़्रॉक घालताना काढ्ताना फ़ारच त्रास होतो!!"

एकदा एक माणुस दुकानात गेला व दुकानदारास म्हणाला-
"काय हो, काल मी तुमच्याकडुन जे डाग घालवायचं औषध घेउन गेलो......" त्यावर दुकानदार म्हणाला "मग आणखि काही हवं आहे का?"
"हो त्या औषधाचे डाग घालवण्याचं औषध हवं आहे।" तो माणूस म्हणाला

एकदा श्री. बोडसे दुकानात गेले व म्हणाले "मी काल तुमच्याकडून जो डबा घेउन गेलो तो उघडायचा कसा ते कळतच नाहीए." त्यावर दुकानदार म्हणाला " डबा कसा उघडायचा याचं पत्रक डब्यातंच आहे."

एकदा एक इन्स्पेक्टर गाडीत शिरला. समोर पाहतो तर एक हवालदार उठून उभा राहिलेला. इन्स्पेक्टर म्हणाला, "अरे अरे उठायची गरज नाही. बसलास तरी चालेल." असे दोन-तीन वेळा झाल्यावर शेवटी तो हवालदार म्हणाला, " साहेब माझं स्टेशन कधीच गेलं. आता तरी मला उतरु द्या.