आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, July 02, 2007

मुक्ताफ़ळे

* बहूतेक स्त्रियांना समान हक्क नको असतात. ते त्यांना फारच कमी वाटतात.

* सिगारेट ही तंबाकूने भरलेली एक नळी आहे तिच्या एका टोकाला विस्तव असतो तर दुसरया टोकाला एक मुर्ख असतो.

* गेल्या दहा वर्षांत स्त्रियांच्यात विशेष असा काहीच बदल झाला नाही। - नाही म्हणायला काही स्रियांचे वय एकदोन वर्षांनी वाढले, एवढेच!

* स्तूतीला काहीच पैसे पडत नाहीत. तरीपण काही लोक तिला फ़ारच किंमत देतात.

* कीर्ति ही मोठी चमत्कारिक स्त्री आहे, ती नेहमी मेलेल्या पुरूषांवर भाळते.

* अश्लीलतेचा वासही नसणे हीच जर उत्कृष्ट साहित्याची एकमेव कसोटी असेल तर दूरध्वनी निर्देशिका (Telephone Directory) हेच जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य का म्हणू नये?

* विद्वान आणि मुर्ख या दोघांत फ़रक इतकाच की पहिल्याला आपल्या अज्ञानाची जाणीव असते व दुस-याला ती नसते.

* द्विभार्या प्रतिबंधक कायद्यामूळे खरे संरक्षण स्त्रियांऐवजी पुरुषांनाच मिळाले आहे।

* ज्ञानाने भूक भागत नाही हे खरं असलं तरी भूक मारून प्राप्त केलेल्या ज्ञानात भूक भागवण्याची क्षमता असते....

भुताटकी


दिवस पावसाळी आणि रात्र काळोखी
त्या घनदाट जंगलात मुहुर्त मात्र अमावशी
कुठं रातकिड्याची किरकिर, कुठं वटवाघळांची फ़डफ़ड
कुठं कोल्हेकुई तर कुठं कुत्र्यांची रडारड

दूरवर एक पडका वाडा
दिसत होता तिथे प्रकाश थोडा
एक वाट चुकलेला प्रवाशी
पाहून मंद उजेड, पोहोचला तो वाड्यापाशी
वाजवलं त्यानं दार, आपटून दारावर कडी
करकरली बिजागरी, उघडला तो दरवाजा लोखंडी
समोर एक सुंदर स्त्री तारूण्यानं रसरसलेली
मुखावर हास्य आणि दागिन्यानं मढवलेली

बसला तो कोचावर, आणलं तिनं पाणी
पाहिलं त्यानं समोर आरश्यात त्याच्याशिवाय नाही कोणी
समोर तर ती उभी, पण आरश्यात मात्र तो फ़क्त
तेव्हा त्याला दिसलं पाण्याच्या ग्लासात रक्त
पाहिलं त्यानं इकडतिकडं, सगळीकडं रक्तच रक्त शिंपडलेलं
कुठं मुंडकं तर कुठं तुटकं हातपाय टांगलेलं
गळाले त्याचे हातपाय, बोबडी त्याची वळली
आता तिथं नव्हती सुंदर स्त्री तर होती एक हडळी
पडले त्याच्या गळ्याभोवती हात तिचे झाले पांढरे त्याचे डोळे
तेवढ्यात लागले दिवे हसतहसत बाहेर आले सगळे

थोड्या वेळापूर्वी वाटलं होतं त्याला, त्या हडळीचं हे तर रूटीन
पण मग कळालं ते तर होतं एका पिक्चरचं शूटींग

-- सुमंत कांबळे

रम्य एका संध्याकाळी...
समुद्र-किनारी वाळुवर...
पहुडलो होतो विचार करत...
येणारया प्रत्येक लाटेवर.....

न-कळत माझ्या हाती...
कधी हात तिचा आला...
क्षणभरात माझ्या अंतरी....
पिसारा मन-मयुराचा फ़ुलला...

नजरेस नजर भिडलि तिच्या....
अन भान मी हरपले...
येणारया प्रत्येक क्षणासोबत...
श्वास घेणेही मंदावले...........

नभातील हर-एक रंगछटा...
नयनी तिच्या मी पाहिली.....
अबोल करुन गेली मजला......
अन भाषा नयनांची राहिली......

तिच्या ह्या 'स्पर्शाने'.....
मन माझे मोहरले...
गुलाबाचे स्वप्न मी...
काट्याविना अनुभवले.....

भास होता हा सर्व.....
एक लाटेने मज सांगितले...
ह्रुदयात जपुन 'स्पर्श' तो...
पाय माझे, घराकडे परतले......