आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, October 09, 2007

कोसळनारा पाऊस जेव्हा तूझ्या घराकडे वळू लागतो
तेव्हा मी सूद्धा त्यच्याबरोबर सेरावेरा पळू लागतो.
मला माहीत आहे तो तूझ्याच अंगणात पडनार आहे
तू घातलेल्या सड्यावर तो मग हलकेच कोसळनार आहे.


स्वताला विसरुन तू मग पावसात नाचू लागशील
मला सुद्धा पाऊस समजुन तळहातावर झेलू पाहशील
मला आवडेल तुझ्या ओन्ज्ळीतल पाणी होऊन राहण
आणि एकत रहाव तू रचलेल पाऊसावरच एखाद सुंदर गाण


पाऊस पडुन गेल्यावर
मी सुद्धा निघून जाइन
पण ओड्याकाटच्या उंच दगडावर ,
मी तुझी वाट पाहिन

-- अमोल
कळत नं कळत,
तु माझ्या इतकी जवळ आलीस,
जाता जाता मनात माझ्या
घर करुन गेलीस.........

घरामध्ये आता या,
कोणीच राहत नाही,
खिडकीतून खुणावणाऱ्या आठवणी
हल्ली मी देखील पाहत नाही........

प्रेमा मध्ये काय ओलावा
कमी होता मझ्या?
की, मनातला दुश्काळ
लांबला होता तुझ्या?

जाता जाता म्हणालीस
विसरुन जा मला,
मनं मात्र माझ विचारतं
कुठे ठेवु तुझ्या वेड्या प्रेमाला?

जपून ठेवलयं मी ते प्रेम
भेटलीस की देइन तुला......
भीती मात्र वाटते खरच
विसरली तर नसशील ना मला????

कवी : ..........
आता तुझी माझी
वाट वेगळी होणार

माझे मन मात्र
तुझ्या मागे जाणार

पुढचा प्रवास आता
एकट्याला करावा लागणार

वाटेवरच प्रत्येक पाउल
जड मनाने पडणार

पडणाऱ्या पावला बरोबर
तुझ्या आठवणी येणार

तू बरोबर नसणार
म्हणुन मनोमन रडणार

माहीत होत मला
कधीतरी हे होणार

एका वळणावर
दोघे वेगळे होणार

म्हणुनच तू जातांना
चेहऱ्यावर हसू आणणार

डोळ्यांमधलं पाणी लपवून
तुला अलविदा म्हणणार

वाट बघितली असती पण
तू नाही येणार

म्हणुनच तू जाईपर्यंत
डोळे भरून पाहणार

कवी: ..........