आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, July 23, 2007

मातीत फुलले गाणे
आकाश गोजिरवाणे
अंतरात पावसाच्या
दडलेले गुढ उखाणे

प्राणात उसळते लाट
अंधार साठला दाट
परी वेड ते प्रकाशाचे
शोधून काढते वाट

घेऊन हिरवे श्वास
ओल्या मनाचि आस
उमटतेच नाजुक नक्षी
तोडुन सारे पाश

झळकती तुरे डौलाने
त्या देवाच्या कौलाने
हरखुन पहातच रहाती
या सृष्टीला नवलाने

इमुकले मौन सळसळते
वार्याशी नाते जुळते
होताच स्पर्श तयाचा
कोवळी कळी हुळहुळते

भरभरुन जीवन जगणे
असण्यातच केवळ रमणे
रंगांचे गंधित गाणे
हळुवारपणे गुणगुणणे

एक ’ भेट ’ काय टळली..

पहायचे होते मला..
तुझ्या डोळ्यांत , माझे प्रतिबिंब..
पहायचे राहून गेले..

ऐकायचे होते मला..
तुझ्या आवाजात , माझे नाव..
ऐकायचे राहून गेले..

अनुभवायचे होते मला..
तुझ्या श्वासांत , माझे श्वास..
अनुभवायचे राहून गेले..

तुला पाहणे, तुला ऐकणे, तुला अनुभवणे....राहून गेले....

भेटीचे तर होते................फक्त बहाणे ,
मजसाठी तर झाले असते ते , ’ जगणे ’..

तुझ्या डोळ्यांच्या तेजात ,
उजळले असते लक्ष दीप , माझ्या नेत्रांत
जे तेवत राहिले असते , उदास अंधा-या रस्त्यांत..

तुझ्या श्वासांच्या सुगंधात ,
फुलले असते संजीवन प्राण , माझ्या श्वासांत
जे भरत राहिले असते जीवन , श्वास रोखणा-या क्षणांत..

तुझ्या आवाजाच्या मारव्यात ,
गुंजले असते मधुर गीत , माझ्या आत्म्यात
जे देत राहिले असते साद , भग्न एकाकी आयुष्यात..

पण, पण....

एक ’ भेट ’ काय टळली..
अन ' जगायचे ' राहून गेले..

' तुझ्याबरोबर ' जगायचे राहून गेले..

- स्वप्ना
दिवेलागणीच्या वेळी !
नको तेच ते का स्मरते...दिवेलागणीच्या वेळी !तुझ्या आठवांना भरते...दिवेलागणीच्या वेळी !
जणू होत आहे चकवा...फिरे काळ एका जागी...पुढे वेळ कोठे सरते...दिवेलागणीच्या वेळी ?
- पडू लागता कायमचा जसा गाव मागे मागे...कुणी पोर डोळे भरते...दिवेलागणीच्या वेळी !
मला एकट्याला बघुनी म्हणे चांदणी एकाकी...तुझा हात मीही धरते...दिवेलागणीच्या वेळी ! !
तुला आठवे का पहिली तिची भेट एकाएकी...?मनी काय हे मोहरते...दिवेलागणीच्या वेळी ?
कुणी येत नाही...मन हे तरीही प्रतीक्षा वेडी -- कशाला कुणाची करते...दिवेलागणीच्या वेळी ?
सुचेनाच काही अगदी...सुचेनाच काही काही...कशाचे न काही ठरते...दिवेलागणीच्या वेळी !
क्षणी या रिकाम्या, परक्या कुठे मी मनाला नेऊ ?उदासी घरी वावरते...दिवेलागणीच्या वेळी !
कुणी दूर का आळवते तिथे मारव्याच्या ताना...?इथे दुःख माझे झरते...दिवेलागणीच्या वेळी !
अशी आर्तता, कातरता कळावी कुणाला माझी ?...मुकी वेदना हंबरते...दिवेलागणीच्या वेळी !
हसू आण ओठांवरती, जरी पापण्या या ओल्या...तुझे तूच घे आवरते...दिवेलागणीच्या वेळी !
- प्रदीप कुलकर्णी