आधुनिकतेच्या वाटेवर धावत्या
आजकालच्या या माणसाकडे
पाहुन वाटतंय की
आता तर सगळी काळजीच मिटलीये..............
चंद्र-सुर्याची आता
गरज आहे कोणाला
जेव्हा ईथे "वेळ" स्वत:च
घड्याळ्याच्या काट्यावर चालु लागलीये.......
आईच्या दुधाचं मोल
कसं कळेल कोणाला
जेव्हा ईथे आजकालची पोरं
पावडरच्या दुधावरही वाढु लागलीयेत.......
"मर्यादेचा अर्थ काय" ?
हे कसं माहित असेल कोणाला
जेव्हा ईथे आजकालची पोरं-पोरी
प्रेमाच्या नावाखाली नको-नको ते चाळे करु लागलीयेत........
महाभारत वाचायची आता
गरजंच कशाला....
आजकालच्या प्रत्येक
घरात महाभारतातली सगळी पात्र सापडू लागलीयेत........
अजुन एक आता तरं
हनीमुनलाही जायची गरजं नाही
आजकाल "टेस्ट-ट्युब" ने
पण पोरं होऊ लागलीयेत............
आधुनिकतेच्या वाटेवर धावत्या
आजकालच्या या माणसाकडे
पाहुन वाटतंय की
आता तर सगळी काळजीच मिटलीये..............
@सचिन काकडे
आनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...
आजचा विशेष
मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे
-- आनंद काळे
बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.
Tuesday, July 03, 2007
राधा ही बावरी हरीची
रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी llधृ.ll
हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहावरूनि श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गूज प्रीतीचे गाणे सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ll१ll
आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती
तुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळति
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरपून जाई
हा चंद्र-चांदणे ढगाआडुनि प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी !!!
रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी llधृ.ll
हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहावरूनि श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गूज प्रीतीचे गाणे सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ll१ll
आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती
तुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळति
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरपून जाई
हा चंद्र-चांदणे ढगाआडुनि प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी !!!
Monday, July 02, 2007
मी तिच्यात नव्हतो
मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती
मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती
तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती
तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती
तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.
नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.
तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती
तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती
आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.
मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती॥
Subscribe to:
Posts (Atom)