आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, April 23, 2007



मैत्री
असावी अशी... मैत्रीसारखी

मैत्री असावी अशी... मैत्रीसारखीहसत राहणारी
हसवत राहणारी...संकटकाळी हात देणारी...

आनंदी समयी साद घालणारी...
मनाची कवाडे उघडून डोकावणारी...

काहीं गुपितांचे राखण करणारी...
सांगता मोहीत करणारी...
कधी कुणाला न लुटणारी...
चांगल्याच कौतुक करणारी...
तितकीच चूका दाखविणारी...
शूध्द सोन्याप्रमाणे चम चम चमकणारी...
मैत्री असावी अशी... मैत्रीसारखी

हल्लीच्या माणसांनी किती ताळतंत्र सोडलय काही कल्पना आहे का?......
अहो परवा आपल्या स्वयंसिद्ध बापूंचं प्रवचन सुरू असताना भक्तगनांमधला एकजण चक्क आरामात सिगरेट ओढत होता..हे दृश्य पाहून मला एवढा धक्का बसला की बिअरचा कॅन खालीच पडला ना माझ्या हातातून!!!!
~:~ प्रेम ~:~

प्रेम म्हणजे बंधन

प्रेम म्हणजे स्पंदन

प्रेम म्हणजे स्वतः झिजून

इतरांसाठी सुवासणारं चंदन


कधी कधी असंख्य भेटी घडूनही

प्रेमाची भावना जागत नाही

तसं प्रेमात पडायला कधी कधी

ती भेटचं घडावी लागत नाही


प्रेम म्हणजे दोन मनांना

आपुलकीनं जोडणारा सेतू असतो

प्रिय व्यक्तीच्या सुखासाठी धडपड

हाच प्रेमाचा निरागस हेतू अस्तो


प्रेम म्हणजे प्रियजणांच्या

चेहऱ्यावर उमटणारा हर्ष असतो

प्रेम म्हणजे जिवात दडलेल्या

आत्म्याचा स्पर्श असतो