Tuesday, February 26, 2008

मराठीच्या पुस्तकात

मराठीच्या पुस्तकात वाटले जातात सहित्यिक
ज्ञानेश्वर दहा मार्कांसाठी
कुसुमाग्रज सात मार्कांसाठी
त्यामुळे पोहोचतच नाही मुलांपर्यंत कधी,
दुरीतांचे तिमिर घालवणारे पसायदान
किंवा कोलंबसचा दुर्दम्य आशावाद
पोहोचतात ते फ़क्त निकालातले आकडे
तुल सत्त्याण्णऊ मला साडे सत्याण्णऊ
मुलं अशीच वाढतात
आणि मग आयुष्यभर सोडवत बसतात आकड्यांचीच गणितं,
शब्द आणि अर्थाना मागे टाकून.

-- हर्षदा सुंठणकर

No comments:

Post a Comment