Wednesday, October 24, 2007

कुणाची तू पोर
करुन शृंगार
करितसे वार
नयनांचे

साडी भरजरी
डोईवर चरी
देतसे लचक
कमरेला

स्वर्गाची अप्सरा
मदनाचा वारा
लावण्याचा झरा
वाहतसे

मनात भरली
क्षणात ठरली
एक तुच परी
लावण्याची

देह गोरा पान
रुपाची तू खाण
हरवले भान
तुजठायी

काय तुझे नाव
कुठे तुझा गाव
घेतला तू ठाव
काळजाचा

--संदीप सुरळे

No comments:

Post a Comment