Tuesday, September 11, 2007

झुकव नजर ही तुझी
करी वार ती मदनाचे
पाहुन तव रसभरीत कांती
चुकती हीशेब स्पंदनाचे

वाटतेस अजुन तू
नाजुकशी जरी सोनकळी
गंध दाटतो तव यौवनाचा
अन खुलते तुझी हर एक पाकळी

कुठल्या दिलात जाऊन
सांग त्याचा करशील घात
हाय.......नशीब त्याचे
असेल जो तुझ्या लावण्याचा नाथ

ओठांचे गुलाब तुझ्या
की हे खंजर काळजात शिरले
काया तुझी मदमस्त अशी
पाहुन अंगअंग थरथरले

चालशी अशी तू
जणु नागीण सळसळावी
तुज पाहुन वाटे
चुकुन आज ही पहाट चळावी

पाज मदिरा तव नयनांनी
नशेत मजला झिंगू दे
ये फ़ुलुन तू आज
या भ्रमरास थोडे पिंगू दे

-- संदीप सुराले

No comments:

Post a Comment