Thursday, August 23, 2007

स्वामीराया !

आधी पेरोनि अंधार
मग दाविशी प्रकाश
लावी सत्यालाच कास
स्वामीराया !

आम्ही तुझीच लेकरं
तुझ्या मायेची पाखरं
राहो क्रुपेची मखर
सदोदित !

वाट चालोनि दमलो
आता शिणलो शिणलो
तुझ्या नामात भिनलो
सांभाळावे !

नको होउ गा क्रुपण
प्रार्थी क्षाळोनी नयन
मनोभावे चरणी लीन
तुझ्या देवा !

-@ अरुण नंदन (23.08.07)

No comments:

Post a Comment